Naval Dockyard : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे सध्या विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्हीही येथे अर्ज करू इच्छित असाल तर खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत.
वरील भरती अंतर्गत एकूण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.
शैक्षणिक पात्रता
वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 8th/ 10th Pass/ ITI अशी आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी वयोमर्यादा 14 ते 18 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज 10 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज https://registration.ind.in/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करा.
-उमेदवारांना अर्जाची हार्ड कॉपी आणि अॅडमिट कार्ड नेव्हल डॉकयार्डला पाठवण्याची आवश्यकता नाही.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.