General Knowledge : आताच्या काळात एखाद्या रूग्णाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी हॉस्पिटल Ambulance ची सुविधा देत आहे. जर हॉस्पिटलकडे त्यांची Ambulance नसेल तर अनेक प्रायव्हेट संस्थाही Ambulance ची सुविधा देत आहेत.
समजा एखाद्या सीरिअस रूग्णाला Ambulance मधून नेण्यात येत असेल तर यातच काही सुविधा दिल्या जातात. परंतु, अनेकांना Ambulance हा शब्द उलटा का लिहितात असा प्रश्न अनेकांना पडत असतो. जर तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल तर जाणून घेऊया त्याचे उत्तर.
वाहनांवर ECNALUBMA असे का लिहितात?
ECNALUBMA लिहिण्यामागे खूप मोठे शास्त्र असून तुम्ही पाहिले असेल की जेव्हाही आपण आपला चेहरा आरशात पाहतो तर तेव्हा त्याचे नेहमीच उलट चित्र तयार होते. त्यामुळे रुग्णवाहिकेवर रिव्हर्स स्पेलिंग लिहिले जाते. ज्यामुळे समोरचे वाहन आरशात दिसले की आपल्याला तो योग्य शब्द दिसेल. आणि आपण पटकन आपले वाहन बाजूला सारून रुग्णवाहिकेला पुढे जाऊ द्यावे.
विशेष रंग वापरण्यात येतात
जर तुम्ही पाहिलं असेल की रुग्णवाहिका गाडीवर बऱ्याचदा लाल, हिरवा किंवा निळ्या रंगात लिहिले असते कारण ते पाहणे सोपे असते. पाहिले तर हे रंग सर्वात वेगाने दिसतात आणि ते ठळक अक्षरात लिहिले तर आपला मेंदू लवकर वाचतो. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना दुरूनच रुग्णवाहिका येत असल्याचे समजताच रस्ता दिला जाईल.