Technology : सध्या उन्हाळा सुरु झाला असून घरामध्ये प्रचंड गरम होत असते. अशा वेळी या गरमीपासून तुमच्या घरातील पंख तुम्हाला वाचवू शकतो यासाठी तुमच्या घरातील फॅनचे स्पीडही चांगले असायला हवे आहे.
जर आपल्या घरातील फॅनचा स्पीड कमी झाला असेल आणि आपण उष्णतेमुळे खूपच हैराण होत असाल तर आज आम्ही आपला फॅन स्लो का होतो आणि त्याचा स्पीड तुम्ही तो कसा वाढवू शकता यांबद्दल सांगणार आहोत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/03/ahmednagarlive24-apanabihar.com_-10.jpg)
आपल्या घरातील फॅनमध्ये असणारा कॅपेसिटर जुना होत असतो. जर आपण त्याचा कॅपेसिटर चेंज केला तर तो पुन्हा एकदा नव्या पंख्याप्रमाणे वेगाने फिरू लागेल. कॅपेसिटर हा पंख्याच्या गतिशी जोडलेला असतो, त्यामुळे त्यात थोडासा दोष असला तरी आपल्या पंख्याचा वेग मंदावतो. त्याचबरोबर पंख्याचे नट बोल्ट लूज असले, त्याचे ब्लेड्स व्यवस्थित नसले तरी आपल्या पंख्याचा वेग कमी होतो.
महत्वाचे म्हणजे पंख्याचा वेग कमी होण्याचे सर्वात मोठे कारण पंख्याच्या सर्विस वेळेवर न करणे. जोपर्यंत आपला पंखा बंद पडत नाही, तोपर्यंत आपण त्याकडे लक्षच देत नाही. त्यामुळे पंख्याचा वेग कमी होतो.
मोकळ्या तसेच थेट हवेच्या जागेवर पंखे बसवणे टाळावे. मोकळ्या जागेत पंखा लावल्याने त्याच्या वेगामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पंख्याचा वेग कमी होतो. या बरोबरच पंखा मोकळ्या हवेत लावल्यास त्यावर प्रमाणात जास्त धूळ साचते, त्यामुळे सुद्धा पंख्याचा वेग कमी होतो.
बरेच ठिकाणी वीजपुरवठ्या मध्ये जास्त ट्रिपिंग होते, त्यामुळे पंख्याच्या वेगावर देखील परिणाम होऊन वीजपुरवठा सतत वाढतो किंवा कमी होतो. अशावेळी लाईट सतत ट्रिपिंग होत असल्यास फॅन न वापरण्याचा प्रयत्न करा.