IMD Alert : हवामान बिघडणार! पुढील ५ दिवस या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, IMDचा अलर्ट जारी

Ahmednagarlive24 office
Published:

IMD Alert : देशातील अनेक भागात दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये अवकाळी पाऊस कोसळला आहे. तर आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याकडून मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मार्च महिन्यात उष्णतेत वाढ होत असते. अनेक राज्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. तसेच या दिवसांत अनेक राज्यांमध्ये पाऊस कोसळत असल्याने तापमानात जराशी घट झाली आहे. पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील ५ दिवस हवामान बिघडणार

वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे पश्चिम हिमालयीन भागात 14 मार्चपर्यंत पावसासह जोरदार वारे वाहू शकतात. याशिवाय 15 ते 17 मार्च दरम्यान दक्षिण, मध्य आणि पूर्व भारतात पावसाची शक्यता IMDने वर्तवली आहे.

या राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो

भारतीय हवामान खात्याकडून पुढील ५ दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाब आणि राजस्थानमध्ये आज जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात १६ मार्चपर्यंत पाऊस पडू शकतो. तर गुजरातमध्ये १४ मार्चपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. IMD ने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पूर्व गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये 17 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

दिल्ली ढगाळ वातावरण

दिल्ली शहरातील १२ मार्च कमला तापमान ३४.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. या महिन्यातील सरासरी तापमान ५ अंशांनी जास्त नोंदवले गेले आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की, सोमवारी (13 मार्च) अंशतः ढगाळ आकाश आणि कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज वर्तवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe