Udayanaraje : साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेत उदयनराजे याचे देवाकडे साकडं, म्हणाले…

 

Udayanaraje : सध्या सातारमधील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे. यामुळे याठिकाणी अनेक भाविक दाखल होत आहेत. या यात्रेला खूप मोठी परंपरा आहे. यामुळे या यात्रेला मोठी गर्दी होत असते. सध्या मोठा संख्यने भाविक बावधनमध्ये दाखल होत आहेत.

असे असताना या बगाड यात्रेसाठी सातारचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील उपस्थित होते. त्यांनी बगडाचे त्यांनी दर्शन घेतले. यावेळी उदयनराजे म्हणाले, या मानाच्या बगाडाची खूप जुनी परंपरा आहे.

अनेक पिढ्यान पिढ्या या गावात लोक एकत्र येत आहेत. ज्या पध्दतीने यात्रेसाठी सर्वजण एकत्र येतात, अशीच एकी कायम रहायला हवी तरच या भागाचे आणि देशाचे कल्याण होईल, असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.

उदयनराजे म्हणाले, मी या देवाला एकच मागणी मागितली लोकांचे भलं होवो उत्कर्ष होवो आणि सर्वाना चांगल्या उंचीवर पोहचावे, अशी मागणी या निमित्ताने उदयनराजे यंनी केली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सध्या गावागावात यात्रा सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी जुनी परंपरा कायम ठेवली जात आहे. तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये राजकीय मंडळी देखील सहभागी होत आहेत.