Pankaja Munde : भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक कॉलेज जीवनातील मोठा किस्सा सांगितला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे. पंकजाताई यांनी कॉलेजच्या वेळचा रॅगिंगचा अनुभवही त्यांनी सांगितला. एके दिवशी कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर विद्यार्थ्यांच्या ग्रुपने पंकजा मुंडे यांची रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला.
वर्गात गरम होत आहे, असे सागूंन त्यांना पंखा सुरु करायला सांगितला. नंतर जास्त हवा लागतेय सांगून पंखा बंद करायला सांगितला. त्यावेळी पंकजा मुंडे यांची राजकीय पार्श्वभूमी उपस्थित विद्यार्थ्यांना कदाचित माहिती नव्हती. यामुळे त्यांच्यासोबत असा प्रकार घडला.
त्यांना वाटले, मी नवीन आहे म्हणून माझी रॅगिंग करावी. पण त्यांच्या लक्षात आलं तेवढ्यातच उपस्थित एका विद्यार्थ्याने माफी मागायला सुरुवात केली आणि उपस्थित सर्वांची धांदल उडाली. तू गृहमंत्र्यांची मुलगी आहेस, कृपया आमच्यावर रागवू नकोस, असे नंतर ते म्हणाले, असा किस्सा त्यांनी सांगितला आहे.
त्या म्हणाल्या, कॉलेजमध्ये जाताना सुरक्षारक्षक नेहमी माझ्यासोबत असायचे. त्यामुळे कॉलेजमध्ये इतर विद्यार्थी उत्सुकतेने पाहायचे. त्यावेळी मी सुरक्षारक्षकांना इमारतीखाली थांबायला सांगायचे. मात्र ही गोष्ट जास्त करून कोणाला माहिती नव्हती.
दरम्यान, इतर विद्यार्थी माझ्याशी बोलायला यायचे. एकदा बोलणं झाली ही आपल्यातलीच आहे, असे म्हणत लवकर मैत्री व्हायची. कॉलेजमध्ये रॅगिंगचे प्रकार सर्रास घडत असतात. पण खुद्द पंकजा मुंडे हे घडले ते देखील त्यांचे बाबा गोपीनाथ मुंडे हे तेव्हा राज्याचे गृहमंत्री होते.