Kanda Anudan : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची घोषणा केली आहे. खरं पाहता गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदान द्यावी अशी मागणी विरोधकांकडून, शेतकरी संघटनांकडून केली जात होती.
याच पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत आज अर्थातच 13 मार्च 2023 रोजी याविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार, आता राज्यातील कांदा उत्पादकांना 300 रुपये प्रति क्विंटल इतक सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
शिंदे यांनी सभागृहाला माहिती देताना सांगितले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 200 रुपये इतक अनुदान देण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने कांदा उत्पादकांची आर्थिक परिस्थिती पाहता 300 रुपये प्रति क्विंटल इतक अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.
दरम्यान आता कांदा उत्पादकांसाठी अनुदानाची घोषणा करत शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य केली आहे. कांदा उत्पादकांकडून शासनाचे या निर्णयाचे स्वागत होत आहे. तूर्तास कांदा अनुदान कोणत्या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही मात्र कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल इतक अनुदान देण्याची घोषणा नुकतीच विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.