Engine oil : तुमच्याकडे अनेकजण कार वापरत असतील. मागणी आणि गरज पाहता अनेक दिग्ग्ज कार उत्पादक कंपन्या त्यांच्या कार्स मार्केटमध्ये लाँच करत आहेत. कोणतीही कार असो तिच्यासाठी इंजिन ऑईल खूप महत्त्वाचे असते. अनेक कारचालक त्याकडे लक्ष देत नाही.
वर्षानुवर्षे काही जण इंजिन ऑईल बदलत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम कारच्या इंजिनवर होताना आपल्याला दिसतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंजिन ऑईल वेळेत बदलले नाही तर त्याचे परिणाम मायलेजवर होतात. तसेच तुम्हाला आर्थिक फटकाही बसतो. त्यामुळे वेळेत इंजिन ऑईल बदलणे गरजेचे आहे.
जाणून घ्या यामागचे गणित
सर्वात अगोदर तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की जर 1200 ते 2000 cc कारमध्ये सेमी सिंथेटिक तेल वापरले जात असेल तर ते 6 महिन्यांनी किंवा 6 हजार किमीवर (जे आधी असेल ते) बदलायला हवे. दुसरीकडे, जर सिंथेटिक तेल वापरले असल्यास ते 10 महिन्यांत किंवा 10 हजार किमी (जे आधी असेल ते) बदलायला हवे.
जाणून घ्या जुन्या तेलाचे नुकसान
याबाबत कार तज्ञांचे म्हणणे आहे की तेल जुने झाल्यावर त्याची क्षमता गमावते. त्यानंतर, इंजिनचे संरक्षण करण्याऐवजी, ते जुने तेल हळूहळू त्याचे नुकसान करते. यामुळे इंजिन जप्त होण्याचा धोका जास्त असतो. तज्ञ म्हणतात की मेकॅनिकच्या तेलाला स्पर्श करून किंवा घासून तेल बदलण्यासारखे आहे की नाही हे सांगण्याचा कोणताही अचूक मार्ग नसून निर्धारित किमीनुसार तेल बदलायला हवे.
काय आहेत फायदे?
गाडीतील इंजिन ऑइल योग्य वेळी बदलले तर त्याचे मायलेज कायम राहते. इंजिन ऑइल कारमध्ये वंगण ठेवते, ज्यामुळे इंजिनमध्ये तयार होणारे घर्षण कमी होते इतकेच नाही तर कारची कार्यक्षमता सुधारली जाते. इंजिनची पिकअप पॉवर राखली जाते. तसेच इंजिनचे भाग लवकर झिजत नाहीत, देखभालीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचतो.