मोठी बातमी ! आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उरण दरम्यान थेट प्रवास; ‘या’ तारखेला सुरू होणार रेल्वे मार्ग

Ajay Patil
Published:
mumbai news

Mumbai News : मुंबई अन उपनगरात धावणाऱ्या लोकल संदर्भात एक मोठी अपडेट हाती येत आहे. खरं पाहता लोकांना मुंबईची जीवन वाहिनी म्हणून ओळखलं जात. मुंबई लोकलच विस्तारलेल जाळ कॅपिटल सिटी ला आपल्या उपनगरांशी कनेक्टिव्हिटी मिळवून देत आहे. लोकलमुळे उपनगर आणि मुंबई या दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत झाली आहे. मात्र असे असले तरी अजूनही उपनगरातील बहुतांशी भागात लोकलचे जाळे विस्तारलेले नाही.

उरणला देखील अद्याप लोकल पोहोचलेली नाही. नवी मुंबई पासून मात्र एका तासाच्या अंतरावर स्थित असलेल्या उरणलाच लोकलची सेवा मिळालेली नाही. पण आता गेल्या 25 वर्षांपासून ज्या उरण रेल्वे मार्गाची वाट पाहिली जात होती तो मार्ग आता अंतिम टप्प्यात आला आहे. या मार्गाचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून हा रेल्वे मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उरण दरम्यान लवकरच लोकल धावणार आहे. यामुळे निश्चितच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खारकोपर ते उरण दरम्यान नुकतीच लोकलची चाचणी घेण्यात आली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी या रेल्वे मार्गावर लोकलची चाचणी पूर्ण झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवी झाले आहेत. विशेष म्हणजे खारकोपर ते उरण पर्यंत सिग्नलची चाचणी देखील घेण्यात आली आहे.

याशिवाय उरण रेल्वे स्थानकावरील साफसफाई देखील जोमात सुरू आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आता उरण पर्यंतचा लोकल प्रवास लवकरच सुरू होईल असा आशावाद तज्ञांकडून व्यक्त होत आहे. वास्तविक नवी मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उरणला गेल्या 25 वर्षांपासून म्हणजेच दोन दशकांपेक्षा अधिक काळापासून लोकलची आतुरता आहे. नेरूळ-उरण रेल्वे मार्ग सुरु करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

यामुळे या रेल्वे मार्ग प्रकल्पाला दोन टप्प्यात पूर्ण करण्याचं नियोजन आखण्यात आलं. या पार्श्वभूमीवर नेरूळ ते खारकोपर पर्यंत काम पूर्ण झालं असून खारकोपर ते उरण पर्यंतच काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसात या मार्गावर लोकल धावणार आहे. वास्तविक गेल्या 25 वर्षांपासून नवी मुंबई ते उरण दरम्यान प्रवास करण्यासाठी एसटी, एन एम एम टी तसेच खाजगी वाहनांच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

मात्र आता या महिन्याअखेर म्हणजेच मार्च 2023 अखेर उरण पर्यंत लोकल सुरू होणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उरण पर्यंत थेट लोकलने प्रवास शक्य होणार आहे. निश्चितच यामुळे मोठा दिलासा प्रवाशांना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe