Smartphone Under 18000 : भारतीय टेक बाजारात सतत शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच होत आहेत. अनेक टेक कंपन्या त्यांचे 5G स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. मागणी आणि फीचर्स चांगले असल्याने या सर्व स्मार्टफोनच्या किमती खूप जास्त आहेत.
त्यामुळे बजेट कमी असल्याने अनेकांना चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोन विकत घेत येत नाही. परंतु, आता तुम्ही कमी बजेटमध्ये चांगले स्मार्टफोन विकत घेऊ शकता. दिग्ग्ज कंपन्यांच्या स्मार्टफोनवर भन्नाट ऑफर उपलब्ध आहेत. पाहुयात त्यांची यादी.

1. Motorola G62 5G
मोटोरोलाचा Motorola G62 5G हा फोन तुम्ही कमी पैशात घरी आणू शकता. हा फोन तुम्हाला 14,999 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबतच तुम्हाला 5000mAh ची मजबूत बॅटरीसुद्धा मिळत असून हा फोन स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटद्वारे समर्थित आहे. तसेच कंपनीच्या या फोनमध्ये 50MP लेन्स उपलब्ध आहे.
2. Tecno Pova Neo 5G
Tecno Pova Neo 5G फोन पैशाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा IPS LCD डिस्प्ले मिळत आहे. तुम्ही हा स्मार्टफोन 15,499 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच या फोनमध्ये 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी उपलब्ध आहे.
3. Samsung Galaxy M33
Samsung चा Galaxy M33 फोन तिसऱ्या क्रमांकावर असून या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.6-इंचाचा FHD + IPS LCD डिस्प्ले मिळेल. या फोनची किंमत 17,479 रुपये असून याशिवाय, फोन Exynos 1280 चिपसेटद्वारे समर्थित आहे. तर या फोनमध्ये 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
4. Redmi 12 5G
तुम्हीआता 17,999 रुपयांमध्ये Redmi 12 5G खरेदी करू शकता. यात तुम्हाला 6.6-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले मिळत असून जो 120hz चा रिफ्रेश दर मिळत आहे. या फोनमध्ये तुमच्यासाठी 48MP + 8MP + 2MP कॅमेरा देण्यात आला आहे.तर यात जलद चार्जिंगसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.