Udayanaraje : साताऱ्यात जाळ आणि धूर संगच! उदयनराजेंची गांधी टोपी घालून जिप्सी राईड…

Ahilyanagarlive24 office
Published:

Udayanaraje : खासदार उदयनराजे हे नेहेमी चर्चेत असणारे नाव आहे. त्यांचे अनेक किस्से हे तरुणांना फारच आवडतात. उदयनराजे भोसले हे बाईक राईड आणि कार ड्राइव्हिगमुळे नेहमीच चर्चेत असतात. अतिशय थाटात गाडी चावलण्याची त्यांची पद्धत अनेकांना आवडते. त्यांच्याकडे अनेक गाड्या देखील आहेत. यामुळे ते नेहेमी यावर दिसतात.

तसेच त्यांच्याकडे सर्व गाड्यांचा नंबर देखील एकच आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील आपल्या जलमंदिर या निवासस्थाच्या परिसरात जिप्सी चालवली. यावेळी मोठ्या स्पीडमध्ये ते गाडी चालवत होते. तसेच गाडीचा आवाज देखील एकदम कडक होता.

अत्यंत वेगाने गाडी चावल्यामुळे जिप्सीच्या सायलेन्सरचा आवाज परिसरात घुमत होता. खूपवेळा त्यांनी हा आवाज काढला. दरम्यान, बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. यामध्ये देखील उदयनराजे सहभागी झाले होते.

या यात्रेत उदयनराजे हे गांधी टोपी घालून दिवसभर यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक देखील उपस्थित होते. यावेळी गांधी टोपी, पांढरा शुभ्र तीन बटणी शर्ट व पायजमा असा पारंपारिक पेहराव करत ते यात्रेत सहभागी झाले.

दरम्यान, उदयनराजे गाड्यांचे चाहते आहेत. उदयनराजेंनी यापूर्वीही अनेकवेळा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बुलेट, जिप्सी चावली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या जिप्सीची राईड चांगलीच चर्चेत आली आहे. याचे फोटो विडिओ व्हायरल झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe