7th Pay Commission : PM मोदी उद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना देणार मोठी खुशखबर! DA वाढीची करणार घोषणा…

Ahmednagarlive24 office
Published:
7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या १५ मार्च २०२३ ला बैठक होणार आहे. यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA वाढवण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा नवीन वर्ष २०२३ मधील DA अजूनही केंद्र सरकारकडून वाढवण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचारी DA वाढीची वाट पाहत आहेत. केंद्र कर्मचाऱ्यांचा DA वर्षातून २ वेळा वाढवला जातो. मात्र या वर्षात एकदाही वाढवण्यात आलेला नाही.

नवीन डीए जानेवारी २०२३ पासून लागू होईल

उद्या होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरेंद्र मोदी DA वाढीची घोषणा करण्याची शक्यता आहे. जर DA वाढ झाली तर कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२३ पासून महागाई भत्ता वाढ मिळण्याची शक्यता आहे. दोन महिन्याचा DA थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

मार्चच्या पगारात थकबाकी मिळेल

१ मार्च रोजी देखील केंद्रीय मंत्रिमंडळाची बठक झाली होती. या बैठकीमध्ये DA वाढीस मंजुरी देखील मिळाली आहे. मात्र केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. जर महागाई भत्ता वाढला तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील DA थकबाकी मार्च महिन्याच्या पगारात मिळेल.

पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार

देशातील लाखो पेन्शनधारकांनाही मोदी सरकार भेटवस्तू देण्यास तयार आहेत. DA वाढीसोबतच सरकार महागाई रिलीफ (DR Hike) मध्ये 4% ने वाढ करणार आहे. पेन्शनधारकांना 42% दराने महागाई सवलत दिली जाईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सध्या DA ३८ टक्के आहे. तसेच आता सरकारकडून ४ टक्के DA वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जर ४ टक्क्यांनी DA वाढला तर कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होऊ शकतो. मागील वेळीही कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe