AC Blast : सावधान! एसीमध्ये कधीही करू नका या चुका अन्यथा एसीचा होईल स्फोट, त्वरित व्हा सावध

Ahmednagarlive24 office
Published:

AC Blast : आता लवकरच उन्हाळ्याचे दिवस सुरु होणार आहेत. त्यामुळे अनेकजण एसी खरेदी करत असतात. पण एसी खरेदी केल्यानंतर अनेकजण खूप चुका करत असतात. या चुका तुमच्या जीवावर देखील येऊ शकतात. त्यामुळे एसीबद्दल नेहमी काळजी घेणे गरजेचे आहे.

बाजारात अनेक कंपन्यांचे एसी उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमतीदेखील वेगवेगळ्या आहेत. जर चांगल्या प्रकारचा एसी बसवायचा असेल तर त्यासाठी हजार किंवा त्यापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. पण काही वेळा एसीचा वापर हा चुकीच्या पद्धतीने केला जात असतो.

काही वेळा अनेक लोक एअर कंडिशनरचा योग्य वापर करत नाहीत आणि निष्काळजीपणामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. काही वेळा एसीकडे दुर्लक्ष करणे तुमच्या जीवावर देखील बेतू शकते.

या चुकांमुळे होऊ शकतो स्फोट

सर्व्हिसिंगमध्ये निष्काळजीपणा

घरामध्ये एसी बसवल्यानंतर त्याकडे पुन्हा लक्ष देत नाहीत फक्त त्याचा वापर घर थंड करण्यासाठी केला जातो. पण एसी बसवल्यानंतर त्याची सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते. अन्यथा त्यामध्ये बिघाड होऊ शकतो. सर्व्हिसिंग करत असताना अनेक गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. एअर कंडिशनरच्या कॉम्प्रेसरमधील दाब आवश्यकतेनुसार ठेवणे गरचेचे आहे अन्यथा स्फोट होऊ शकतो.

जास्त कूलंट भरणे

जर तुम्ही तुमच्या एअर कंडिशनरच्या कंप्रेसरमध्ये ठरवलेल्या पातळीपेक्षा जास्त कूलंट भरले असेल आणि त्यात काही प्रकारची गळती असेल तर त्यामुळे एअर कंडिशनरमध्ये स्फोट होऊ शकतो.

गळतीमुळे स्फोट

एसी वापरात असताना अनेकदा काही चुका केल्या जातात. कूलिंग पाईप्समधून गळती होत असेल तर त्याचा मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे तुमचा जीबीव्हीं जाऊ शकतो. कूलिंग पाईप्समधून गळती होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe