BEL Recruitment : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी, या पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या तपशील

Ahmednagarlive24 office
Published:

BEL Recruitment : कोरोना काळात अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच अनेक नवीन पदवी उत्तीर्ण तरुणांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे अनेकजण आजकाल नोकरीच्या शोधात आहेत. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत अशा तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरी करण्याची सुर्वणसंधी आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये २६ पदांवर भरती निघाली आहे. त्यासाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता.

या भरतीद्वारे प्रशिक्षणार्थी आणि प्रकल्प अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यांचे हे शिक्षण किंवा कोर्स पूर्ण झाला आहे असे तरुण यासाठी अर्ज करू शकतात.

१५ मार्चपर्यंत अर्ज करू शकता

ज्या तरुणांना भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये नोकरी करायची आहे त्यांनी त्वरित अर्ज करावा. कारण यासाठी १५ मर्चंपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत उद्या संपणार आहे. तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट bel-india.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज देखील करू शकता.

या 26 पदांवर भरती निघाली आहे

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधील या भरती प्रक्रियेद्वारे, प्रशिक्षणार्थी अभियंता 12 आणि प्रकल्प अभियंता 26 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदांसाठी भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक विज्ञान किंवा संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. ज्या तरुणांकडे अभियांत्रिकी पदवी आहे असे तरुण यासाठी अर्ज करू शकतात.

वय

भरतीसाठी पात्र उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2023 पासून मोजले जाईल. ज्यामध्ये ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयात सूट दिली जाईल.

प्रशिक्षणार्थी अभियंता – कमाल वयोमर्यादा 28 वर्षे
प्रकल्प अभियंता – कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी अर्जदारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्ज प्रक्रिया

सर्व प्रथम BEL bel-india.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर होम पेजवर दिलेल्या करिअर विभागात जा.
संबंधित पदासाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू करा.
आता सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe