Hyundai EV car : Hyundai कंपनीकडून ऑटो क्षेत्रात आणखी एक नवीन जबरदस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कारचा पर्याय उपलब्ध झाला आहे. Hyundai कंपनीकडून या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.
Hyundai Kona 2023 कंपनीने पूर्णपणे रीडिझाइन केली आहे. या कारचे २०२३ मधील नवीन मॉडेलचे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले आहे. कंपनीकडून अधिकृतपणे कारची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
नवीन आवृत्ती सुरक्षिततेच्या दृष्टीने मजबूत असेल
कारला रॅपराऊंड फ्रंट लाईट, पिक्सेल ग्राफिक्स एक्सटीरियर आणि शार्प लाईन्स देण्यात येतील. कारमधील ADAS, Blind-Spot Collision Avoidance Assist ते अधिक सुरक्षित करेल. ही कार बाजारात ICE, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 490 किमी धावेल. हाय बीम असिस्ट, लेन किपिंग असिस्ट आणि फॉरवर्ड टक्कर टाळणे सहाय्य प्रणाली लोकांचा प्रवास सुरक्षित ठेवेल. या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
कार दोन बॅटरी पॅकसह उपलब्ध असेल
Hyundai कंपनीकडून या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. 48.4 kWh आणि 65.4 kWh असे हे दोन बॅटरी पॅक देण्यात येतील. कारमध्ये 12.3-इंचाचा ड्युअल-स्क्रीन डॅशबोर्ड, एलईडी लाइटिंग आणि इलेक्ट्रॉनिक गियर सिलेक्टर असेल.
सध्या कंपनीने कारच्या नवीन किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट केलेली नाही. कारच्या किमतीबाबत दावा केला जात आहे की कारची सुरुवातीची किंमत 25 लाख रुपये एक्स-शोरूम असेल. कारमध्ये 8 स्पीकर साउंड सिस्टम, हेड्स-अप डिस्प्ले, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि पॉवर टेल गेट असेल.