7th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आज केंद्र सरकारकडून मोठी बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत मोठी घोषणा करण्यात येऊ शकते.
१ मार्च २०२३ रोजी देखील केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या DA वाढीला ग्रीन सिग्नल मिळाला असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्याबाबत कोणतेही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.
आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा DA वाढवण्याबाबत घोषणा करू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या पगारातही बंपर वाढ होऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ अपेक्षित असून, १५ मार्च रोजी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ३८ वरून ४१ टक्के होईल. सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
पगार किती वाढेल
15 मार्च रोजी 7व्या वेतन आयोगांतर्गत डीए वाढीची घोषणा झाल्यास, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2023 पासून वाढीव वेतन मिळू शकेल आणि हे अंतिम रकमेत देखील जोडले जाऊ शकते.
महागाई भत्ता 3 टक्के ठेवल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे 10,800 रुपयांची वाढ होईल. मूळ वेतन 18,000 रुपये आणि 56,900 रुपये मूळ वेतन विचारात घेऊन ही रक्कम गृहीत धरली जाते.
सरकारकडून अद्याप माहिती स्पष्ट नाही
केंद्र सरकारकडून अद्याप DA वाढीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मागील केंद्र सरकारच्या बैठकीमध्ये जरी DA वाढीस मंजुरी मिळाली असली तरी त्याबाबत कोणतीही नोटीस जारी करण्यात आलेली नाही.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 7व्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीबाबतची बातमी मोदी सरकारकडून दिली जाऊ शकते. त्यामुळे अधिकृतरित्या कर्मचाऱ्यांच्या DA वाढीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.