Sanjay Raut : सध्या आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना आता खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार टीका केली आहे.
राऊत म्हणाले, तुम्ही मुका घ्या नाही तर मिठ्या मारा. आम्हाला का टार्गेट करत आहात? आमच्या कार्यकर्त्यांना का अटक केली जात आहे? तुम्ही मुके घेतले, तुम्हीच निस्तरा. त्याच्याशी आम्हाला घेणंदेणं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.

तसेच ते म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी मुका घेणारे सुर्वे हे पहिले गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला. सुर्वे यांच्या मुलानेच तो व्हिडीओ लाईव्ह केला होता. त्याला अटक का केली नाही? असेही संजय राऊत म्हणाले.
मुका घ्या मुका नावाचा सिनेमा सुरू आहे. आज दादा कोंडके हवे होते. त्यांचा सिनेमा गाजला होता. मुका घ्या मुका. मुका घ्या मुका प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करता? त्यांचा संबंध काय? हा सत्तेचा गैरवापर आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
आम्ही सांगितले का सार्वजनिक कार्यक्रमात मुका घ्यायला? मुळात तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. तसेच प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्या फेसबुक अकाऊंटचीही तपासणी व्हावी. आमदाराचा व्हिडिओ डुप्लीकेट असेल तर जरुर कारवाई करा, असेही म्हटले जात आहे.