IMD Rain Alert : राज्यासह देशात बदलणाऱ्या हवामानामुळे पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 17 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर काही राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
याच बरोबर IMD ने महाराष्ट्रसह पूर्वेकडील राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे. IMD ने अलर्ट जारी करत केरळ, कर्नाटक, तामिळनाडूसह महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मुंबईतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात राज्यात हवामान बदलेल असा विश्वास देखील हवामान विभागणाने वर्तविला आहे.
या भागात हवामान बदलेल
नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राजस्थान, हरियाणा, पंजाब, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशासह मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय संपूर्ण भारतात पाऊस आणि भूस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेशातही हवामानात झपाट्याने बदल होईल. या आठवड्यात या भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय भूस्खलनाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
हवामान इशारा
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस, गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशातील काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. अंदमान आणि निकोबार बेटे, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, सौराष्ट्र, कच्छ, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू पुद्दुचेरी, कराईकल, कर्नाटक, केरळमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाट आणि गारांसह विखुरलेला पाऊस पडू शकतो. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
पुढील 24 तासांचा इशारा
पुढील 24 तासांत, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड या ईशान्येकडील राज्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
17 मार्चपासून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये पावसाच्या हालचाली सुरू होणार आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्स उद्या पश्चिम हिमालयापर्यंत पोहोचेल. त्यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.
सक्रिय हवामानामुळे उत्तर मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. अंतर्गत कर्नाटक आणि दक्षिण छत्तीसगडच्या काही भागात 20 मार्चपर्यंत मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 16 मार्चपासून पश्चिम हिमालयात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर, लेह लडाख मुझफ्फराबादसह उत्तराखंड आणि हिमाचलच्या डोंगराळ भागात पुढील 5 दिवस पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या भागात गारपिटीचा इशारा
20 मार्च रोजी हवामान खात्याने संपूर्ण मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि काही पूर्वेकडील राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासातील हवामान
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गेल्या 24 तासांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडला आहे. यासोबतच अनेक भागात मेघगर्जनेसह गारपीटही होत आहे. याशिवाय पंजाबच्या अनेक ठिकाणांसह पश्चिम राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशच्या एक-दोन ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
हवामान खात्यानुसार मान्सूनपूर्व हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशातील मान्सूनची क्रिया सामान्यपेक्षा लवकर असू शकते. राजस्थानमध्ये 16 ते 21 मार्च दरम्यान हवामानाचा परिणाम होईल. अनेक ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. 20 मार्चपर्यंत असेच वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हे पण वाचा :- ‘शक्तिशाली त्रिग्रही योग’ तयार ! ‘या’ 3 राशींचे चमकणार नशीब; गुरु आणि सूर्यदेवाची असेल विशेष कृपा । Trigrahi Yog In Pisces