Gold Price Today : सोने-चांदी खरेदीदारांची लॉटरी! सोने 900 तर चांदी 13100 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Ahmednagarlive24 office
Published:

Gold Price Today : देशात लवकरच लग्नसराई सुरु होणार आहे. त्यामुळे जर तुम्हीही लग्नासाठी सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोने आणि चांदी खरेदी करणे शक्य नव्हते. मात्र सध्या दर कमी झाल्याने अनेकजण सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करत आहेत.

सोन्याचा भाव पुन्हा एकदा 57902 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 66861 रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचली आहे. सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार कायम आहे. त्यामुळे स्वस्त दरात सोने आणि चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

सोने 900 ते 13100 रुपयांनी स्वस्त होत आहे

गेल्या काही दिवसांपूर्वी सोने आणो चांदीचे दर खूपच वाढले होते. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 58882 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. मात्र सध्या सोने उच्चांकापेक्षा 900 रुपयांनी स्वस्त मिळत आहे तर चांदी 13100 रुपये प्रति किलो दराने स्वस्त मिळत आहे.

नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

या वाढीनंतर 24 कॅरेट सोने 297 रुपयांनी महाग होऊन 57902 रुपये झाले, 23 कॅरेट सोने 297 रुपयांनी महाग होऊन 57671 रुपये झाले, 22 कॅरेट सोने 272 रुपयांनी महाग होऊन 53038 रुपये झाले, 18 कॅरेट सोने 222 रुपयांनी महाग होऊन 43426 रुपये झाले आणि 14 कॅरेट सोने 173 रुपयांनी महाग होऊन प्रति 10 ग्रॅम 33872 रुपयांवर व्यवहार होत आहे.

IBJA वर सोने आणि चांदीची स्थिती

जर तुम्हाला घरबसल्या सोने आणि चांदीचे दर जाणून घेईचे असतील तर तुम्ही दररोज IBJA च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन रोजचे दर जाणून घेऊ शकता. या ठिकाणी दररोज सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe