Sanjay Gaikwad : आम्ही कर्ज काढून आमदार झालोय, आमची पेन्शन बंद करू नये, आमदाराने मांडली व्यथा…

Published on -

Sanjay Gaikwad : सध्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेवरून संप सुरू आहे. यामुळे अनेकांचे मोठे हाल सुरू आहेत. तसेच यावरून आमदार खासदारांची पेन्शन देखील बंद करण्याची मागणी केली जात आहे. आता शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी आमदारांच्या पेन्शनवरही त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, पेन्शन योजनेवरून सध्या आंदोलन सुरु आहे. यात पेन्शनची मागणी करणारे बरेचशे कर्मचारी असे आहेत जे अजूनही सेवेमध्ये आहेत. 25 साली ते रिटायर होणार आहे.

असे असताना त्यांच्याकडून सामंजस्याची भूमिका घेतली जात नाही. ज्या आमदारांना वाटतं की, त्यांची पेन्शन त्यांना नको त्यांनी खुशाल द्यावी. पण आमच्यासारख्या गोरगरिबांनी ज्यांनी कर्ज काढून इथंपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, अशा आमदारांना पैशांची गरज आहे, असेही ते म्हणाले.

पेन्शनची गरज आहे आणि त्यामुळे आमच्या पेन्शनचा विषय नाहीये, आम्ही पेंशन नको असे म्हणणार नाही, असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या सरकारी कर्मचाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. आता काय होणार लवकरच समजेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe