Vi Recharge Plan : Vi ने आणले दोन पैसा वसूल रिचार्ज प्लॅन, 78 दिवस मिळणार डेटासह अनेक फायदे

Published on -

Vi Recharge Plan : वोडाफोन आयडिया या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने बीएसएनएल, जिओ आणि एअरटेलला जोरदार टक्कर देण्यासाठी मस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे. कंपनी सतत नवनवीन प्लॅन लाँच करत असते. हे रिचार्ज प्लॅन स्वस्त किंमतीत येत आहेत.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 78 दिवसांसाठी डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे. हे लक्षात घ्या की कंपनीचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन असणार आहे. इतकेच नाही तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये डेटा आणि अमर्यादित कॉलिंगशिवाय इतर प्लॅन दिले जाणार आहेत. पाहुयात सविस्तर यादी.

289 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Vi च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 48 दिवसांची वैधता मिळत असून तुम्ही हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर, यात तुम्हाला संपूर्ण वैधतेसाठी इंटरनेट वापरासाठी एकूण 4 GB डेटा मिळेल.

या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. तसेच तुम्हाला मेसेजिंगसाठी एकूण 600 एसएमएस सुविधा दिली जात आहे. तुम्ही दीर्घ वैधतेसाठी कोणता रिचार्ज प्लॅन शोधत असल्यास तुम्ही आता हा प्लॅन तुमच्या स्मार्टफोनमध्ये रिचार्ज करू शकता.

429 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

कंपनीच्या या 429 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 78 दिवसांची वैधता मिळत असून रूमही हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा मिळेल.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी एकूण 6 GB डेटा मिळत आहे. यात 6GB इंटरनेट डेटाची वैधता 78 दिवसांसाठी असणार आहे. तुम्हाला प्लॅनमध्ये मेसेजिंगसाठी एकूण 1000 एसएमएस सुविधा देण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News