Facebook Profile : लपून छपून कोण पाहतंय तुमचे फेसबुक प्रोफाइल, ‘या’ सोप्या पद्धतीने पहा

Published on -

Facebook Profile : फेसबुक सर्वात प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जण आपला बराच वेळ घालवत आहेत. फेसबुकचा वापर पोस्ट शेअर करण्यापासून ते मित्रांसोबत चर्चा तसेच गेम खेळण्यापर्यंत करता येतो.

परंतु, अनेक यूजर फेसबुकवर तुमची प्रोफाइल पाहत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला याची कसलीच माहिती सुद्धा नसते. परंतु, तुम्हाला आता ते सहज समजू शकते. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. पाहुयात सविस्तर.

फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1

  • तुमच्या पाठीमागे तुमच्या फेसबुक आयडी कोण शोधात आहे हे तुम्हाला शोधायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर फेसबुकची वेब आवृत्ती वापरावी लागणार आहे.
  • त्यानंतर आता याठिकाणी तुम्हाला आयडी आणि पासवर्डसह लॉग इन करावे लागणार आहे.

स्टेप 2

  • जेव्हा तुम्ही वेब आवृत्तीवर लॉग इन करता तेव्हा तुम्हाला याठिकाणी उजवे क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला view page source चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 3

  • यानंतर तुम्हाला Control + F सह बटण दाबावे लागणार आहे.
  • आता सर्च बारवर जाऊन तुम्हाला Buddy ID वर क्लिक करावे लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला कोणताही आयडी कॉपी करून नवीन टॅबमध्ये उघडावा लागणार आहे.

स्टेप 4

  • आता तुम्हाला URL स्पेसमध्ये Facebook.com/15-अंकी आयडी लिहावा लागणार आहे.
  • हे टाइप केल्यानंतर प्रविष्ट करावे लागणार आहे.
  • एंटर केल्यानंतर, तुमचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीचे फेसबुक प्रोफाइल तुमच्या समोर येईल.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News