7th Pay Commission : देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सरकार आता पुन्हा एकदा पगार वाढवण्याच्या तयारीत आहे. जर सरकारने पगारवाढीचा निर्णय घेतला तर याचा फायदा कोट्यवधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 38 टक्के दराने महागाई भत्ता देत आहे. सरकार आता महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे. जर त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली तर महागाई भत्ता 42 टक्के इतका होईल. साहजिकच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.
सरकार आता लवकरच महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते. केंद्र सरकार सतत वाढत्या महागाईशी लढण्यासाठी महागाई भत्ता वाढवत असते. साधारणपणे जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा सुधारित करण्यात येते. सामान्यत: मार्च आणि ऑक्टोबर महिन्यांत वाढीची घोषणा करण्यात येते.
असे झाले तर 31 मार्चपासून कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळेल. पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन मिळू शकेल. इतकेच नाही तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याची थकबाकीही त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
महागाई भत्ता 38 ते 42 टक्के असणार
हे लक्षात घ्या की सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डीए देण्यात येत आहे. जर त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली तर ती 42 टक्के होईल.यानंतर, 18,000 रुपये मूळ वेतन असणाऱ्यांसाठी वार्षिक महागाई भत्ता वाढून 90,720 रुपये इतका होईल. सध्याच्या महागाई भत्त्यातील फरकाबाबत बोलायचे झाल्यास पगारात दरमहा 720 रुपये तर वार्षिक 8640 रुपयांची वाढ होईल. तसेच 56900 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 2276 रुपयांची वाढ होईल. म्हणजे आता वार्षिक आधारावर पगारात 27312 रुपयांनी वाढ होऊ शकते.
18,000 च्या किमान मूळ पगारावर गणना
कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रु. 18,000
नवीन महागाई भत्ता (42%) रु.7560/महिना
आत्तापर्यंतचा महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना
किती महागाई भत्ता वाढला 7560-6840 = रु 720/महिना
वार्षिक पगारात 720X12 = 8640 रुपये वाढ
कमाल मूळ पगाराची गणना रु.56900
कर्मचार्यांचे मूळ वेतन रु 56900
नवीन महागाई भत्ता (42%) रु 23898/महिना
आतापर्यंत महागाई भत्ता (38%) रुपये 21622/महिना
किती महागाई भत्ता वाढला 23898-21622 = रु 2276/महिना
वार्षिक पगारात वाढ 2276X12 = रु. 27312
लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार फायदा
देशातील लाखो कर्मचारी याची आतुरतेने वाट पाहत असून याचा फायदा 65 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 48 लाख पेन्शनधारकांना होईल. यानंतर 1 जुलै 2023 रोजी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकते.