Top 5 CNG Cars : देशात वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे आज लोक मोठ्या प्रमाणात सीएनजी कार्स खरेदी करताना दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सीएनजी कार पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा जास्त मायलेज देते यामुळे लोकांची हजारो रुपयांची बचत होते.
यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही या लेखात तुम्हाला बेस्ट पाच सीएनजी कार्सबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी खरेदी करू शकतात.
Hyundai Grand i10 Nios
Hyundai Grand i10 Nios ही उत्तम फीचर्ससह देशातील CNG कार सेगमेंटमध्ये बरीच लोकप्रिय आहे. याला CNG किटसह 1.2 लिटर इंजिन मिळते, जे 83 Ps ची कमाल पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. CNG मोडमध्ये पॉवर आउटपुट 68 bhp आणि टॉर्क 96.2 Nm पर्यंत घसरते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही मॅग्ना, स्पोर्ट्झ आणि अॅस्ट्रा या तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची किंमत ₹ 7.16 लाख (एक्स-शोरूम) आहे.
Maruti Suzuki Swift
मारुती स्विफ्टमध्ये 1.2L, चार सिलेंडर, Dualjet इंजिन आहे. सीएनजी मोडमध्ये हे इंजिन 77 पीएस पॉवर आणि 98.5 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनी 30.90 किमी/किलो मायलेजचा दावा करते. ही हॅचबॅक मॅन्युअल गिअरबॉक्ससह VXi आणि ZXi या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची किंमत ₹ 7.8 लाख (एक्स-शोरूम) आहे.
Tata Tiago
Tata Tiago iCNG हा कंपनीचा सर्वात स्वस्त CNG व्हेरियंट आहे. ही हॅचबॅक 1.2 लीटर, 2 सिलेंडर रेव्होट्रॉन इंजिनने सुसज्ज आहे. जे 86 Ps ची कमाल पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. CNG मोडमध्ये पॉवर आउटपुट 73 Ps आणि टॉर्क 95 Nm पर्यंत घसरते. ही फक्त 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीने 26.49 किमी/किलो मायलेजचा दावा केला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 6.30 लाख (एक्स-शोरूम) आहे.
Hyundai Aura
कॉम्पॅक्ट CNG सेडान Hyundai Aura तिचे इंजिन Hyundai Grand i10 Nios सोबत शेअर करते. हे 83 Ps ची कमाल पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. CNG मोडमध्ये पॉवर आउटपुट 68 Ps आणि टॉर्क 95 Nm पर्यंत घसरते. Hyundai Aura CNG 2 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची किंमत 6.09 लाख (एक्स-शोरूम) आहे.
Tata Tigor
टाटा टिगोर हेच इंजिन Tiago iCNG सोबत शेअर करते. ही हॅचबॅक 1.2 लीटर, 2 सिलेंडर रेव्होट्रॉन इंजिनने सुसज्ज आहे. जे 86 Ps ची कमाल पॉवर आणि 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. CNG मोडमध्ये पॉवर आउटपुट 73 Ps आणि टॉर्क 95 Nm पर्यंत घसरते. ही फक्त 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. त्याची सुरुवातीची किंमत 7.40 लाख (एक्स-शोरूम) आहे.
हे पण वाचा :- Upcoming IPO Next Week: तयारी करा ! ‘या’ 2 कंपन्यांचे आयपीओ पुढील आठवड्यात उघडणार ; गुंतवणूकदार होणार मालामाल