Skip to content
AhmednagarLive24

AhmednagarLive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy

Bank Account Hake : सावधान ! असा एसएमएस तुम्हाला आला तर होईल बँक अकाउंट रिकाम, नुकसान होण्याआधी जाणून घ्या काय करावे…

Sunday, March 19, 2023, 9:50 AM by Ahilyanagarlive24 Office

Bank Account Hake : कोरोनाच्या काळानंतर ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणात तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

यामध्ये खोट्या एसएमएस चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याद्वारे बरेच जणांची बँक अकाउंट रिकामी होत आहेत. सामान्य नागरिकांना जाळ्यात अडकून सायबर गुन्हेगार हे त्यांच्या घामाचे पैसे काही सेकंदात लुबडत आहेत.

ग्राहकांना सतत या संदर्भात बँकांकडून वाचवण्यासाठी सारखेच एसएमएस केले जातात. गेले काही दिवसापासून एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आपली केवायसी करण्यासाठी एसएमएस येत आहे. हा मेसेज फसवणूक करणारा मेसेज असल्याचे समोर आले आहे.

काही नंबर वरून अशा प्रकारचे मेसेज केले जातात यामध्ये ग्राहकांना फसवले जाते. केवायसी संदर्भात या मेसेज मध्ये सांगितले जाते. अशा मेसेज मधून ग्राहकांच्या खात्यात संदर्भात माहिती गोळा करतात आणि त्यांच्या खात्यातील पैसे लुटतात. अशा प्रकारचे मेसेज पासून सावध राहण्याचा सल्ला एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिला आहे.

अशा प्रकारचे मेसेज मध्ये एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना त्वरित केवायसी करण्यास सांगितले जात आहे. अशा मेसेजमध्ये एक लिंक ही देण्यात येते. यावर ग्राहकांना क्लिक करण्यास सांगितले जाते.

त्याचबरोबर या लिंक वर क्लिक न केल्यास आपल्या अकाउंट ब्लॉक केले जाईल असेही या मेसेजमध्ये सांगितले जाते. अशा प्रकारचे मेसेज लागत असतात. आणि त्या लिंक वर क्लिक करतात. त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे कट झालेला मेसेज येतो.

कोणत्याही दहा अंकी मोबाईल नंबर वरून आलेला मेसेजला रिप्लाय न देण्याचा आणि लिंक वर क्लिक करण्याचा एचडीएफसी बँकेकडून ग्राहकांना सांगण्यात आले आहे. एचडीएफसी बँक ही आपल्याला कोणती वैयक्तिक माहिती, CVV, बँक अकाउंट डिटेल्स विचारत नाही. त्याचबरोबर ई-मेल आणि एसएमएस सुद्धा शेअर करण्यास सांगत नाही.

काय करावे?

आपल्याला आलेला एसेमेस टाकून तयार करून आलेला आहे हे चेक करा. एचडीएफसी बँक ही नेहमीच ऑफिशियल आयडीवरूनच ग्राहकांना एसएमएस करते. त्याच बरोबर बँकेची अधिकृत लिंक या http://hdfcbk.io अशी आहे.

इतर कोणत्याही नंबर वरून आलेला मेसेजला बळी न पडता आपल्या बँकांमध्ये कुठलीही माहिती त्यांना शेअर करू नका. अशा प्रकारच्या एसएमएस किंवा मेलला रिपोर्ट करण्यासाठी आपण [email protected] यावर संपर्क करू शकता.

Categories महाराष्ट्र, आर्थिक Tags Bank Account Hake
Chandrasekhar Bawankule : आधी म्हणाले 240 जागा लढवणार आता म्हणाले काहीच ठरले नाही, बावनकुळेंच्या मनात आहे तरी काय?
Business Idea : पशुपालनाच्या निगडीत असणारा ‘हा’ व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, सरकारही करेल मदत; जाणून घ्या व्यवसाय
© 2025 AhmednagarLive24 • Built with GeneratePress