मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ कारणामुळे राजधानीमधील वाहतुकीत होणार मोठा बदल; तब्बल पाच महिने ‘या’ ठिकाणची वाहतूक बंद, पहा….

Published on -

Mumbai Traffic News : मुंबईमध्ये रस्ते विकासाची वेगवेगळी कामे सध्या सुरू आहेत. यामध्ये काही ठिकाणी फ्लाय ओव्हर तयार केले जात आहेत, काही ठिकाणी भुयारी मार्ग विकसित होत आहेत. यासोबतच काही मोठमोठ्या प्रोजेक्टवर देखील काम सुरू आहे. यामध्ये कोस्टल रोडचा देखील समावेश आहे. आता कोस्टल रोड चे काम हे जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना कोस्टल रोडची भेट मिळणार आहे.

निश्चितच कोस्टल रोड हा एक महत्त्वाचा असा प्रोजेक्ट असून यामुळे राजधानी मुंबईमधील वाहतूक कोंडी बहुतांशी कमी होण्यास मदत होणार आहे. तत्पूर्वी मात्र मुंबईकरांना काही कष्ट घ्यावे लागणार आहेत. कारण की कोस्टल रोडच्या कामासाठी आता मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल होणार आहे. या प्रकल्पांतर्गत सध्या स्थितीला मरीन ड्राइव्हजवळील एनएस मार्गावर जोमात काम सुरू आहे.

हे पण वाचा :- आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! अवकाळीच्या नुकसानीची माहिती पाठवण्यासाठी कृषिमंत्र्यांनी जारी केलेला नंबर नॉट रीचेबल; आता शेतकऱ्यांनी करावं काय?

यापूर्वी मात्र मरीन ड्राइव्हच्या दक्षिणेकडील कॅरेजवेवर म्हणजेच तारापोरवाला मत्स्यालय ते इस्लाम जिमखाना दरम्यान एस.डब्लू.डी. ड्रेनेज आउटफॉलचे काम करणे आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कामासाठी मात्र मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेत बदल करावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कामासाठी तब्बल पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

यामुळे मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेत जो बदल होईल तो बदल पुढील पाच महिने कायम राहणार आहे. यामुळे मुंबईकरांना वाहतुकीमध्ये नेमका कोणता बदल झाला आहे अन कोणते पर्यायी मार्ग यासाठी शासनाकडून सुचवण्यात आले आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती असणे अनिवार्य आहे. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसाने एक परिपत्रक देखील जारी केल आहे. यानुसार कोस्टल रोडसाठी आवश्यक काम करणे हेतू दक्षिण मुंबईत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

हे पण वाचा :- अखेर तोडगा निघाला! कर्मचाऱ्यांची संप मागे घेण्याची घोषणा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर निर्णय, चर्चेत नेमकं काय ठरलं, पहा

त्यानुसार एनएस मार्गावरून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक जिमखान्याजवळील सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे. निश्चितच त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिकांनी आता प्रवासाठी एनएस मार्गाचा वापर करणे टाळावे, अशी सूचना वाहतूक पोलिसांकडून यावेळी देण्यात आली आहे. सोबतच दक्षिण मुंबईतून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी महर्षी कर्वे रोड, केम्प्स कॉर्नर, नाना चौक, ऑपेरा हाऊस, सैफी हॉस्पिटल, चर्चगेट स्टेशन या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

एकंदरीतच, पुढील पाच महिने दक्षिण मुंबईमध्ये वाहतूक कोंडीची समस्या राहणार आहे. पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है या उक्तीप्रमाणे कोस्टल रोड मिळवण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना पुढील पाच महिने मुंबईकरांना करावा लागणार आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख यांच्यावर पैसा घेऊन हवामान अंदाज सांगण्याचा आरोप; महाराष्ट्रात एकच खळबळ, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe