Salary Hike : जर तुम्ही नोकरी करत असाल आणि खाजगी कंपनीत काम करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता 1 एप्रिलपासून तुम्हाला वेतनवाढ लागू केली जाईल.
कारण अनेक कंपन्या काही दिवसांनी याची घोषणा करून त्यांच्या कर्मचाऱ्यांना वाढीव पगार थकबाकीसह देणार आहेत. दरम्यान, 2023 मध्ये खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी 10.2 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/03/ahmednagarlive24-salary-increase.jpg)
सरासरी पगार वाढ 10.2% अपेक्षित
यावेळी ई-कॉमर्स, व्यावसायिक सेवा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जास्तीत जास्त वाढ अपेक्षित आहे. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे. व्यावसायिक सेवा प्रदाता EY च्या ‘फ्यूचर ऑफ पे’ 2023 च्या अहवालात असे म्हटले आहे की 2023 मध्ये देशातील पगार सरासरी 10.2 टक्क्यांनी वाढू शकतो. हे प्रमाण 2022 च्या सरासरी 10.4 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
2022 च्या तुलनेत कमी वाढ होण्याची शक्यता
अहवालात असे म्हटले आहे की यावर्षी सर्व क्षेत्रांमध्ये पगारात अंदाजे वाढ दिसून येईल, जी 2022 च्या तुलनेत किरकोळ कमी असेल. तथापि, कारखान्यांमध्ये काम करणार्या कामगारांच्या बाबतीत, 2022 च्या तुलनेत यावर्षी वेतनवाढ कमी होण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, ज्या क्षेत्रांमध्ये पगारवाढ अपेक्षित आहे ते सर्व तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत.
ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक 12.5 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर, व्यावसायिक सेवांमध्ये 11.9 टक्के आणि आयटी क्षेत्रात 10.8 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
EY चा अहवाल सर्वेक्षणावर आधारित आहे. हे सर्वेक्षण डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान करण्यात आले. यामध्ये देशातील मध्यम ते मोठ्या संस्थांचे 150 मुख्य मानव संसाधन अधिकारी सहभागी झाले होते.