Best Budget Cars : तुम्ही देखील तुमच्यासाठी येणाऱ्या काळात स्वस्तात मस्त कार खरेदीचा विचार करत असला तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये बाजारात अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या आणि भन्नाट फीचर्ससह उत्तम मायलेज देणाऱ्या कार्सची माहिती देणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्यासाठी 5 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये बेस्ट कार खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट कार्सबद्दल संपूर्ण माहीती.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बाजारात सध्या ह्या कार्स धुमाकूळ घालत आहे. ग्राहकांना ह्या कार्समध्ये अगदी कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्स आणि उत्तम मायलेज मिळतो यामुळे सध्या बाजारात या कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यामुळे तुमच्यासाठी कमी किमतीमध्ये ह्या कार्स सर्वात बेस्ट पर्याय ठरू शकतात.
Maruti Suzuki Alto 800 And Alto K10
मारुतीची सुझुकी देशाच्या बाजारपेठेत Alto नावाने दोन कार विकते, ज्यामध्ये Alto 800 आणि Alto K10 येतात. Alto K10 पावरफुल इंजिन आणि अपडेटेड फीचर्ससह येतो. Alto 800 पेक्षा किंचित महाग असताना, दोन्ही कारमध्ये CNG चा पर्याय मिळतो, तर Alto 800 ची एक्स-शोरूम किंमत 3.54 लाख रुपये आहे. Alto K10 ची सुरुवातीची किंमत 3.99 लाख रुपये आहे.
Renault Kwid
Renault Kwid ही देशातील सर्वात मोठी एंट्री लेव्हल कार आहे आणि ती दोन इंजिन पर्यायांसह येते. यात एक 0.8 लीटर पेट्रोल आणि दुसरे 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे पेट्रोल इंजिन 54 PS पॉवर आणि 72 Nm पीक टॉर्क निर्माण करते. तर 1.0-लिटर पेट्रोल इंजिन 68 PS आणि 91 Nm पीक टॉर्क निर्माण करते. यात स्टॅन्डर म्हणून 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. त्याच वेळी, 1 लिटर इंजिनसह, इन्फोटेनमेंट सिस्टम, EBD, ABS आणि मागील पार्किंग सेन्सर्ससह कीलेस एंट्री उपलब्ध आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 4.64 लाख रुपये आहे.
Maruti Eeco
Maruti Eeco ही सर्वोत्तम 7 सीटर कार आहे, तिला 1.2 लीटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 73 पीएस पॉवर आणि 98 एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारमध्ये सीएनजी पर्याय उपलब्ध आहे, सीएनजीवरील त्याचे इंजिन 63 पीएस पॉवर निर्माण करते, सीएनजीवर 20 किलो मायलेज देते. ही कार 5 ते 7 सीटर दोन्ही कारमध्ये येते. त्याची सुरुवातीची किंमत 4.63 लाख रुपये आहे.
हे पण वाचा :- SBI खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! मिळणार 35 लाख रुपयांचा लाभ ; कसे ते जाणून घ्या