RBI Recruitment 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! या पदांसाठी बंपर भरती सुरु, असा करा अर्ज

Ahmednagarlive24 office
Published:

RBI Recruitment 2023 : तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी रिझर्व्ह बँकेमध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती निघाली आहे. यासाठी तुम्हीही अर्ज करू शकता.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने फार्मासिस्ट पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आरबीआयच्या rbi.org.in या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून २५ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १० एप्रिलपर्यंत यासाठी अर्ज करू शकता. १० एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. यानंतर पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी पडताळणी केली जाईल.

योग्यता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदाराने फार्मसी कायदा 1948 अंतर्गत नोंदणीकृत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमधील डिप्लोमाची किमान पात्रता देखील असणे आवश्यक आहे.

तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुमचे शिक्षण मॅट्रिक किंवा डिप्लोमाची किमान पात्रता असणे आवश्यक आहे. जर तुमचे हे शिक्षण पूर्ण झाले असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.

निवड प्रक्रिया

बँक शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत घेईल. उमेदवारांना एकूण शैक्षणिक पात्रता (PG/पदवी/डिप्लोमा), विविध बँक दवाखान्यांपासूनचे निवासस्थान, PSB/PSU/सरकारी संस्था/RBI मधील अनुभव इत्यादींच्या आधारावर निवडले जाईल. आलेल्या अर्जांपैकी त्याची छाननी केली जाईल आणि त्यानंतर उरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

येथे पाठव फॉर्म

सर्व आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रतीसह रीतसर भरलेला अर्ज प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – 400 001 बाय 1700 येथे पाठवावा. 10 एप्रिल 2023 रोजी तुमचे फॉर्म या ठिकाणी पोहोचले पाहिजेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe