Car Buying Fromula : कार खरेदीदारांनो द्या लक्ष! पगारानुसार किती रुपयांपर्यंत खरेदी करावी कार? जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

Car Buying Fromula : अनेकांचे स्वप्न असते की स्वतःचे घर आणि स्वतःची एक छोटी का होईना पण कार असावी. यासाठी अनेकजण दिवसरात्र कष्ट करत असतात. पण जर तुम्हाला कार घेईची असेल तर तुमच्या पगारानुसारच ती खरेदी केली पाहिजे.

घराव्यतिरिक्त अनेकांच्या आयुष्यात कार घेणे हा सर्वात मोठा दुसरा खर्च असतो. प्रत्येकजण आपापल्या बजेटनुसार कार आणि घर खरेदी करत असतो. पण अनेकदा कार खरेदी करत असताना बजेट पलीकडे जाऊन ती खरेदी केली जाते. त्यामुळे जास्तीचा आर्थिक ताण येतो.

तुमच्या योग्यतेनुसार आणि गरजेनुसार कार खरेदी करणे कधीही फायद्याचेच ठरेल. अनेकदा फायनान्स कंपन्या कर्ज देखील पुरवतात पण हे कर्ज पुन्हा फेडणे देखील अनेकांना कठीण होते. त्यामुळे तुम्हाला कार खरेदीचा एक फॉर्म्युला सांगणार आहोत.

नवीन कार घेत असताना अनेकांना किती रुपयापर्यंतची कार खरेदी करायची हा प्रश्न पडत असतो. कोणत्याही ठिकाणी पैसे खर्च करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्याला पगार किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून किती पैसे येणे आहे याचा विचार करून पैसे खर्च करावेत. त्यासाठी २ फॉर्म्युले महत्वाचे आहेत.

1. वार्षिक उत्पन्नाच्या निम्म्यापेक्षा जास्त खर्च करू नका

जर तुम्ही नवीन कार खरेदी करत असाल तर तुम्ही वार्षिक उत्पन्नाच्या निम्म्यापेक्षा जास्त खर्च करू नका. उदारणार्थ. समजा एखादी व्यक्ती वर्षाला 10 लाख रुपये कमावते, तर कार खरेदीचे योग्य बजेट 5 लाख रुपये असेल. लक्षात ठेवा की हे बजेट कारच्या ऑन-रोड किमतीच्या संदर्भात असले पाहिजे कारण शेवटी तुमचा पॉकेटमनी कारच्या ऑन-रोड किमतीएवढा आहे.

2- 20/4/10 फॉर्म्युलाची काळजी घ्या

तुम्ही कर्जावर कार खरेदी करत असाल तर 20/4/10 फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्यानुसार कार खरेदी करा. हे एक अतिशय लोकप्रिय सूत्र आहे. यानुसार, कर्जावर कार खरेदी करताना, त्याच्या किमतीच्या किमान 20% डाउन पेमेंट करा, कर्ज परतफेडीचा कालावधी चार वर्षांपेक्षा जास्त नसावा आणि कर्जाचा EMI तुमच्या पगाराच्या 10% पेक्षा जास्त नसावा.

जर वरील गोष्टींचा विचार करून तुम्ही कार खरेदी केली तर नकीच तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होणार नाही आणि कोणताही तोटा होणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe