Car Price Hike : Maruti ने दिला ग्राहकांना मोठा धक्का! एप्रिलपासून ‘ह्या’ कार्स होणार महाग ; जाणून घ्या नवीन किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

Car Price Hike : देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय कार कंपनी बाजारात मागच्या अनेक वर्षांपासून ग्राहकांना अगदी कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह येणाऱ्या कार्स ऑफर करत आहे. यामुळे देशातील बाजारात मारुती सुझुकीच्या सर्वाधिक कार्स विक्री होताना दिसत आहे.

मात्र आता मारुतीने एक मोठा निणर्य घेत ग्राहकांना मोठी धक्का दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मिळालेल्या माहितीनुसार मारुती आता आपल्या कार्सच्या किमतीमध्ये वाढ करणार आहे. यामुळे आता ग्राहकांना मारुती सुझुकीची नवीन कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. मात्र कार्सच्या किमतीमध्ये किती वाढ होणार आहे याची माहिती अद्याप मारुतीने दिलेली नाही. मारुती सुझुकीने आज गुरुवारी जाहीर केले की कंपनी एप्रिल 2023 मध्ये किमती वाढवणार आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की, वाहनांच्या निर्मिती खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, “मारुती सुझुकी सतत खर्च कमी करण्यासाठी आणि काही प्रमाणात वाढ भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु असे असूनही किंमत वाढवणे आवश्यक झाले आहे.” मारुती सुझुकीने वाहनांच्या किमती किती वाढवल्या जाणार हे अद्याप सांगितलेले नाही. हे वेगवेगळ्या मॉडेल्सवर अवलंबून असेल.

हिरोच्या बाइकही महागणार

Maruti Suzuki व्यतिरिक्त, Hero MotoCorp, देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनीने आधीच घोषणा केली होती की कंपनी 1 एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात येत असल्याचेही हिरो मोटोकॉर्पचे म्हणणे आहे.

Hero MotoCorp च्या बाइक्स आणि स्कूटरच्या किमतीत सुमारे 2 टक्क्यांनी वाढ होणार आहे. Hero MotoCorp ने सांगितले की OBD2 (ऑन-बोर्ड डायग्नोस्टिक्स) ट्रांजिशपमुळे किंमतीत वाढ झाल्यामुळे किंमतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

1 एप्रिलपासून, वाहनांना रिअल-टाइम ड्रायव्हिंग उत्सर्जन पातळीचे परीक्षण करण्यासाठी ऑन-बोर्ड स्व-निदान डिवाइस असणे आवश्यक आहे. सध्या वाहन उत्पादक त्यांची वाहने BS6 फेज-II साठी तयार करत आहेत, ज्याची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून होणार आहे.

हे पण वाचा :-  Chanakya Niti: सावधान ! ‘या’ कामानंतर पाणी पिणे पिऊ नये नाहीतर होणार ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe