WhatsApp : देशात करोडो नागरिक व्हॉट्सॲपचा वापर करत आहेत. व्हॉट्सॲप हे एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप बनले आहे. ज्यावरून लाखो लोक चॅटींग करत असतात. पण व्हॉट्सॲपवरून चॅटिंग करणे महागात पडू शकते. तसेच काहीवेळा तुमचे अकाउंट देखील बंद केले जाऊ शकते.
व्हॉट्सॲपवर आजकाल चॅटिंग बरोबरच लाखो लोक ऑडिओ कॉल आणि व्हिडिओ कॉलचा आनंद घेत आहेत. पण आता व्हॉट्सॲपवर गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवणे तुमच्यासाठी चुकीचे ठरू शकते. जर गुड मॉर्निंग मेसेज केला तर तुमचे अकाउंट कायमचे बंद देखील केले जाईल.
दररोज उठल्याबरोबर इतरांना गुड मॉर्निंग करणे म्हणजे तुमचे व्हॉट्सॲप कायमचे बंद करणे आहे. कारण आता असे मेसेज करणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. त्यामुळे लवकरच असे मेसेज करणे बंद करा.
खाते का बंद केले जाऊ शकते
जर तुम्ही एकच मेसेज वारंवार अनेकांना सतत पाठवला किंवा फॉरवर्ड केला तर तुमचे अकाउंट कायमचे बंद होऊ शकते. अशा स्थितीत कंपनी मेसेजला स्पॅम मानते. यामुळे तुमचे खाते बॅन देखील होऊ शकते.
फक्त हा मेसेजचं नाही तर इतरही अनेक मेसेज आहेत जे तुम्ही पुन्हा पुन्हा इतरांना पाठवल्यास तुमचे अकाउंट बॅन होईल आणि तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे आता व्हॉट्सॲप वापरताना आता काळजी घेणे गरजेचे आहे. एकच मेसेज वारंवार इतरांना पाठवणे टाळा अन्यथा तुमचे देखील व्हॉट्सॲप बंद होईल.
अकाऊंट बॅन देखील असे होऊ शकते
जर तुम्ही अधिक संपर्क शेअर केले तर तुमचे व्हॉट्सॲप खाते बंद केले जाऊ शकते. अशावेळीही हीच गोष्ट लागू होते की, जर तुम्ही एकाच प्रकारचे काम पुन्हा पुन्हा करत असाल तर खाते बॅन होईल त्यामुळे तुम्ही या गोष्टी टाळा.
सतत एकच मेसेज इतरांना पाठवणे कंपनीकडून स्पॅम ठरवले जाईल. त्यामुळे तुम्हीही असेच एक मेसेज दररोज इतरांना पाठवत असाल तर लवकरच सावध व्हा अन्यथा तुमचे देखील खाते बंद केले जाऊ शकते.