Honda Amaze Price Hike: सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या लोकप्रिय कार्सवर बंपर डिस्काउंट देत आहे ज्याचा फायदा घेत अनेकजण बंपर डिस्काउंटसह नवीन कार खरेदी करत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो देशात 1 एप्रिलपासून उत्सर्जनाचे नवीन नियम लागू होणार आहे यामुळे सर्व वाहन उत्पादकांना त्यांच्या इंजिनमध्ये बदल करावे लागणार आहे.
यामुळे ग्राहकांना 1 एप्रिलपासून कार खरेदीवर जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. तुम्ही कार खरेदी करणार असाल तर 1 एप्रिलपासून डिस्काउंटचा फायदा घेत नवीन कार खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या 1 एप्रिलपासून मारुती सुझुकीच्या कार्स महाग होणार आहे तर आता Honda ने देखील ग्राहकांना धक्का देत 1 एप्रिलपासून Amaze 12,000 रुपयांनी महाग करणार असल्याची घोषणा केली आहे.
Honda Amaze चे सर्व व्हेरियंट महाग
1 एप्रिलपासून होंडा अमेझच्या सर्व व्हेरियंटच्या किमती वाढणार आहेत. कंपनीने त्याची अधिकृत घोषणा केली आहे. तथापि, कंपनीने त्याच्या वेगवेगळ्या ट्रिम्सच्या आधारे Honda Amaze ची किंमत अद्याप स्पष्ट केलेली नाही. हे स्पष्ट आहे की कंपनी आपली एंट्री-लेव्हल कॉम्पॅक्ट सेडान Honda Amaze 1 एप्रिलपासून 12,000 रुपयांनी महाग करेल.
Honda City महागणार?
कंपनीचे उपाध्यक्ष (मार्केटिंग आणि सेल्स) कुणाल बहल यांनी स्पष्ट केले आहे की कंपनी सध्या फक्त होंडा अमेझच्या किंमती वाढवत आहे. ते पुढे म्हणाले की कंपनी त्यांच्या मिड साइजच्या सेडान होंडा सिटीच्या किमतीत कोणताही बदल करणार नाही.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष (मार्केटिंग आणि सेल्स) कुणाल बहल म्हणाले की, आम्ही 1 एप्रिलपासून अमेझच्या किमती 12,000 रुपयांनी वाढवू. उत्सर्जनाच्या कठोर नियमांमुळे उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सर्वच कंपन्या दर वाढवत आहेत
हे काम फक्त होंडाने केलेले नाही हे आम्ही तुम्हाला सांगतो. नवीन BS6 फेज-2 नियम आणि कडक उत्सर्जन नियम लागू केल्यानंतर सर्व कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत. अलीकडेच Hero MotoCorp ने घोषणा केली आहे की पुढील महिन्यापासून ते त्यांच्या मॉडेल रेंजच्या किमती सुमारे 2 टक्क्यांनी वाढवत आहेत. त्याचप्रमाणे टाटा मोटर्सने 1 एप्रिल 2023 पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! ड्रायव्हिंग टेस्ट न देता 7 दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स पोहोचेल घरी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया