Price Hike : भारतीय बाजारात दिवसेंदिवस कार-बाईक तसेच इतर वाहने खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व दिग्ग्ज वाहन निर्माता कंपन्या अनेक फीचर्स असणारे वाहने सादर करत आहेत. तसेच या वाहनांच्या किमतीही जास्त आहेत. अशातच आता सर्व ग्राहकांना धक्का देणारी एक महत्त्वाची बातमी आहे.
कारण आता पुन्हा एकदा काही दिग्ग्ज कंपन्या आपल्या वाहनाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करणार आहे. कंपन्यांच्या या निर्णयामुळे आता ग्राहकांना वाहन खरेदी करताना पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.कोणती कंपनी किती दर वाढवत आहे? जाणून घ्या.
मारुती सुझुकी
आता मारुती सुझुकी ही दिग्ग्ज कंपनी 1 एप्रिल 2023 पासून सर्व वाहनांच्या किमती वाढवणार आहे अशी माहिती मारुती सुझुकीकडून दिली आहे. परंतु, अजूनही किमती किती वाढवणार याची माहिती कंपनीकडून दिली नाही. याबाबत कंपनीने असे सांगितले की आमच्याकडून खर्च कमी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले आहेत परंतु आता किमतीत वाढ करणे खूप गरजेचे झाले आहे. त्यामुळे आता कंपनीकडून प्रत्येक मॉडेलवर वेगवेगळी भाडेवाढ करण्यात येणार आहे.
टाटा मोटर्स
कंपनी 1 एप्रिल 2023 पासून व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार आहे अशी माहिती टाटा मोटर्सकडून अगोदरच दिली होती. 1 एप्रिलपासून वाहनांच्या किमती पाच टक्क्यांनी वाढवणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी कंपनीने दिली होती.
होंडा कार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 एप्रिल 2023 पासून होंडाच्या कारच्या किमतीत वाढ होऊ शकते. नवीन सिटी कंपनीने 2 मार्च रोजी लॉन्च केली होती, त्यामुळे सिटीच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही. परंतु, कंपनीच्या इतर कारच्या किमती बदलण्यात येऊ शकतात अशी अपेक्षा आहे.
हिरो मोटोकॉर्प
Hero MotoCorp ही आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी येत्या 1 एप्रिलपासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आता 1 एप्रिल 2023 पासून कंपनी आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किमती दोन टक्क्यांनी वाढ करणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक मॉडेलच्या किमती स्वतंत्रपणे वाढवण्यात येतील.
का वाढवल्या जात आहेत किमती
संपूर्ण देशभरात 1 एप्रिलपासून बीएस-VI च्या दुसऱ्या टप्प्यातील नियम लागू होणार असून या नियमांच्या अंमलबजावणीनंतर, वाहनांच्या उत्सर्जनावर वास्तविक वेळेत लक्ष ठेवता येणार आहे. त्यामुळे कंपन्यांकडून वाहनांच्या इंजिनमध्ये अपडेट केल्याने खर्च वाढला आहे. खर्च वाढल्याने कंपन्यांकडून दरात वाढ केली जात आहे.