Fire Boltt Legacy : भारतात फायर बोल्टने आपले नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. नवीनतम फायर-बोल्ट स्मार्टवॉचमध्ये कंपनीने 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड दिले आहेत. कंपनीचे आगामी स्मार्टवॉच ग्राहकांना ब्लॅक, ब्राउन आणि सिल्व्हर अशा कलरमध्ये खरेदी करता येईल.
कंपनीचे नवीन स्मार्टवॉच हे स्टेनलेस स्टील डिझाइनसह एक स्टाइलिश स्मार्टवॉच आहे. तुम्हाला उद्यापासून ते फ्लिपकार्ट तसेच कंपनीच्या साइटद्वारे विकत घेता येईल. त्याची किंमत 3,999 रुपये इतकी आहे. यात कॉलिंग आणि डिस्प्ले फीचर कसे असणार? जाणून घ्या.

आता फायर बोल्ट लेगेसीसह 1.43-इंच AMOLED स्क्रीन ऑल्वेज ऑन वैशिष्ट्यासह उपलब्ध असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बजेट स्मार्टवॉचमध्ये वायरलेस चार्जिंगची सुविधाही कंपनीने दिली आहे. ग्राहकांना आता फायर बोल्ट लेगेसी लेदर आणि स्टेनलेस स्टील या दोन मॉडेलमध्ये खरेदी करता येणार आहे. फायर बोल्ट लेगसी हे स्मार्टवॉच ग्राहकांना ब्राउन, सिल्व्हर आणि ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येईल. तसेच यात एक मोफत सिलिकॉन पट्टा उपलब्ध आहे.
येत्या 25 मार्चपासून या स्मार्टवॉचची विक्री फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या साइटद्वारे करता येणार आहे. कंपनीच्या नवीन स्मार्टवॉचची किंमत 3,999 रुपये ठेवली आहे. या स्मार्टवॉचला पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग मिळाली आहे. तसेच यात 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड दिले आहेत आणि त्यात कॉलिंग फीचर कंपनीने दिले आहे.
हे स्मार्टवॉच 330mAh बॅटरी पॅक करते, ज्याचा 7 दिवसांपर्यंत बॅकअप देण्याचा दावा केला जात आहे. याच्या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 60Hz आहे. इतकेच नाही तर यामध्ये शेअर बाजाराचे अपडेटही रिअल टाइममध्ये मिळतात.
आरोग्य वैशिष्ट्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर यात फायर बोल्ट लेगेसी रिअल-टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप मॉनिटर, SpO2 ट्रॅकिंग आणि पीरियड ट्रॅकिंग ऑफर करते. तुम्ही या स्मार्टवॉचच्या मदतीने तुमच्या फोनचा कॅमेरा नियंत्रित करू शकता.