LIC Jeevan Pragati Plan : भन्नाट योजना! 200 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा 28 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

LIC Jeevan Pragati Plan : LIC देशातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी सरकारी विमा कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या पॉलिसी ऑफर करत असते. या विमा कंपनीच्या अनेक योजना आहेत ज्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला लागू होत असतात.

त्यामुळे एलआयसीच्या माध्यमातून आता प्रत्येक व्यक्तीचे भविष्य सुरक्षित करता येऊ शकते. LIC ची अशीच एक योजना आहे ती म्हणजे जीवन प्रगती योजना. तुम्ही या योजनेत दररोज 200 रुपये गुंतवून 28 लाख रुपयांचा निधी जमा करू शकता.काय आहे संपूर्ण योजना जाणून घ्या.

जर तुम्ही या योजनेत प्रत्येक महिन्याला 6 हजार रुपये गुंतवले तर तुमचे दररोज 200 रुपये वाचतात. म्हणजेच तुम्ही या योजनेत एका वर्षात एकूण 72 हजार रुपये गुंतवाल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे LIC जीवन प्रगती योजनेतील जोखीम संरक्षण दर पाच वर्षांनी वाढते. समजा जर एखाद्याने योजनेअंतर्गत 4 लाखांची पॉलिसी घेतली असेल तर ही रक्कम पाच वर्षांत 5 लाख रुपये इतकी होते.

तसेच 10 ते 15 वर्षांत ही रक्कम 6 लाख रुपये आणि 20 वर्षांत ही रक्कम 7 लाख रुपये इतकी होते. समजा जर यादरम्यान त्या पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर बोनस आणि विम्याची रक्कम नॉमिनीला देण्यात येते.

या योजनेत 20 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर 20 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्हाला व्याजासह एकूण 28 लाख रुपये मिळतील. या योजनेत आता 12 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील लोक एलआयसीच्या जीवन प्रगती योजनेत गुंतवणूक करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe