Government Employee DA Hike News : सध्या देशभरात जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून कर्मचारी आणि शासन आमने-सामने आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मनात जुनी पेन्शन योजना वरून शासनाविरोधात रोष वाढत आहे. राज्यातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी देखील जुनी पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून 14 मार्चपासून बेमुदत संपाचे आयोजन केले होते.
हा संप 21 मार्चपर्यंत चालला. यानंतर शासनाने आश्वासने दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. दरम्यान आता जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना झाली आहे. केंद्र शासनाने देखील नुकतेच नवीन पेन्शन योजनेत आकर्षक बदल करण्यासाठी समितीची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

सितारामन यांनी या संदर्भात काल लोकसभेत माहिती दिली आहे. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठी माहिती हाती आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच डीए मध्ये मोठी वाढ झाली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सद्यस्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के डीए मिळत आहे. यामध्ये आता चार टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता आता मिळणार आहे. हा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून अनुज्ञेय म्हणजे लागू राहणार आहे.
हे पण वाचा :- पुणे, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! Pune-Mumbai थेट विमानसेवा ‘या’ दिवशी सुरू होणार; असे राहणार तिकीट दर
यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए मधील एरियर किंवा थकबाकी देखील मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त पेन्शन धारक केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे सध्या स्थितीला कार्यरत असलेल्या 47 लाख 58 हजार इतक्या सेंट्रल गव्हर्मेंट मधील कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच 69 लाख 76 हजार इतक्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. निश्चितच केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.
हे पण वाचा :- राज्यातील शेतकऱ्यांना ‘या’ योजनेअंतर्गत रोपवाटिका उभारण्यासाठी मिळणार पावणेतीन लाखांच अनुदान; अर्ज करण्याची…
किती वाढणार पगार?
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 30 हजार रुपये असेल तर त्याला आता 12,600 रुपये इतका मासिक महागाई भत्ता मिळणार आहे. आतापर्यंत 38% दराने या 30000 रुपये वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला अकरा हजार चारशे रुपये इतका मासिक महागाई भत्ता मिळत होता. म्हणजेच या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता महागाई भत्ता म्हणून बाराशे रुपयाची वाढ झाली आहे.