Bank Holiday : लक्ष द्या…! एप्रिल महिन्यात पंधरा दिवस बँक राहणार बंद; जाणून घ्या कोणकोणत्या दिवशी असेल सुट्टी

Published on -

Bank Holiday : जर तुमची बँकेत महत्वाची कामे राहिली असतील तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. कारण आम्ही या बातमीमध्ये एप्रिल महिन्यात बँकांच्या येणाऱ्या सुट्ट्यांची यादी घेऊन आलो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरबीआयने या महिन्यात बँकांना रविवारी ही कामकाज करायला लावत आहे. तर पुढच्या महिन्यात तब्बल पंधरा दिवसांची सुट्टी दिली आहे. त्यामुळे आपली जी कामे असतील ते लवकरच करून घ्या. नाहीतर आपले नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

कारण रिझर्व बँक ऑफ इंडिया येणाऱ्या पुढील महिन्यातील म्हणजेच प्रत्येक महिन्याची सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. सरकारी बँक एप्रिल महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांची यादी आरबीआय ने प्रकाशित केली आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील बरेच महत्त्वाचे सण आहेत त्यामुळे सरकारी बँका पंधरा दिवस बंद राहणार आहेत.

आपली जर बँक विषयी काही महत्त्वाचे काम असेल तर ते आपण आत्ताच लवकर पूर्ण केले पाहिजे असा सल्ला जानकारांकडून दिला जात आहे. जर आपल्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आपण एप्रिल महिन्यात बँकेचे काही काम पूर्ण करणार असाल तर आपण सुट्ट्यांची यादी आत्ताच तपासली पाहिजे. कारण कारण सुट्ट्यांची यादी तपासली तरच आपल्याला पुढील नियोजन लावता येणार आहे.

भारतीय रिझर्व बँकेच्या नियोजनानुसार एप्रिल महिन्यात सरकारी तसेच खाजगी बँका यांना पंधरा दिवस सुट्ट्या असणार आहेत. परंतु काही दिवस संपूर्ण भारत देशात बँका बंद असणार आहेत.

या पंधरा दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये काही स्थानिक सुट्टी आहेत तर काही राष्ट्रीय सुट्टी आहे. या पंधरा दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये सलग तीन दिवस जर बँका बंद असतील तर एटीएम वरती मोठा ताण येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला हवे तेवढे पैसे आत्ताच जवळ काढून ठेवा.

जाणून घ्या एप्रिल महिन्यात कोणत्या दिवशी सुट्टी असणार आहे

1 एप्रिल 2023 – अकाउंट क्लोजिंग असल्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील.

2 एप्रिल 2023 – रविवार आहे.

4 एप्रिल 2023 – या दिवशी महावीर जयंती आहे.

5 एप्रिल 2023 – बाबू जगजीवन राम जन्मदिवस या दिवशी आहे.

7 एप्रिल 2023 – या दिवशी गुड फ्रायडे आहे.

8 एप्रिल 2023 -या दिवशी दुसरा शनिवार असेल.
9 एप्रिल 2023 – रविवारची सुट्टी.

14 एप्रिल 2023- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती.

15 एप्रिल 2023 – बोहाग, बिहु, बिशू

16 एप्रिल 2023 – रविवारची सुट्टी

18 एप्रिल 2023 – शब्-ए

21 एप्रिल 2023 – रमजान ईद

22 एप्रिल 2023 – रमजान ईद

23 एप्रिल 2023 – रविवार सुट्टी

30 एप्रिल 2023 – रविवार सुट्टी

टीप – ही प्राथमिक माहितीच्या आधारे दिलेल्या सुट्ट्यांची यादी आहे. यामध्ये बदलही होऊ शकतो. कृपया शहानिशा करावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe