Ahmednagar News : राहुरी पेटीएममध्ये कामाला असल्याचे खोटे सांगून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका व गोटुंबे आखाडा येथील एका अशा दोन व्यापाऱ्यांना दोन भागट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. एकाच्या खात्यावरून २९ हजार व दुसऱ्याच्या खात्यावरून १० हजार रुपये काढून घेतल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, कौ प्रकाश शिवाजी नगरे (वय ३५ वर्षे) हे ब्राम्हणी येथे राहातात. त्यांचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम त्यांच्या -_ दकानावर गेले. आम्ही पेटीएम कंपनीत कामाला असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरे यांनी पेटीएम बंद करावयाचे असल्याचे सांगितले. या भागट्यांनी त्यांचा मोबाईल, आधार कार्ड व पॅन कार्ड घेतले. दोन दिवसांनी कंपनीचे लोक येतील, त्यांना तुम्ही पेटीएम साउंड बॉक्स, चार्जर देऊन टाका, असे सांगून तेथून निघून गेले.
दिनांक १३ मार्च रोजी नगरे यांना पेटीएम कंपनीचा फोन आला व त्यांनी मला विचारणा केली को, तुम्ही पेटीएपचे क्रेडीट पोस्टपेड पेमेंट घेतलेले आहे, ते पैसे भरले का नाही. त्यावेळी आपली फसवणूक करून खात्यामधून एकूण २९ हजार रुपए काढून घेतल्याचे नगरे यांच्या लक्षात आले.
त्याचप्रमाणे गणेश – रहाणे (राहणार गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) यांच्या सप्तश्रुंगी जनरल स्टोअर्स या दुकानातही असाच प्रकार झाला. त्यांच्या खात्यामधुन १० हजार रुपये काढून घेतले. या दोन्ही घटनेतील रक्कम विनोदकुमार बब्रुवान बनसोडे यांच्या पेटीएमच्या पोस्टपेड खात्यावर गेली आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नगरे यांनी राहुरी पोलिस ठण्यात फियांद दिली.त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा रजि. नं. ३२१/२०२३ नुसार भा.द.वि. कलम ४२०, ४१९, ३४, ६६ (सी) प्रमाणे फसवणूकोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.