Youtube Without Wifi : आता इंटरनेट नसेल तरीही पाहता येणार युट्युबवर एचडी व्हिडिओ, करा फक्त ‘हे’ काम

 

Youtube Without Wifi : जगभरात युट्युबचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. अशातच युट्युब आपल्या युजर्सना अनेक फीचर्स देत असते. तसेच आता ही कंपनी युजर्सना ऑफलाइन व्हिडिओ फिचर देत आहे. कंपनीने सन 2014 मध्ये त्यात ऑफलाइन व्ह्यू फीचर देण्यात आले होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे Android आणि iOS दोन्ही युजर्सना हे फीचर्स वापरता येते. हे व्हिडिओ युजर्स आता सेव्ह करू शकतात. युजर्सना आता इंटरनेट नसेल तरीही युट्युब वर एचडी व्हिडिओ पाहता येणार आहे. काय आहे हे फिचर? ते कसे काम करते? पहा.

असे पहा इंटरनेटशिवाय व्हिडिओ

समजा जर तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी iOS किंवा Android फोन वापरत असल्यास ही पद्धत तुमच्या इंटरनेटची खूप बचत करू शकते. परंतु हा व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला प्रथम YouTube अॅपवर जावे लागणार आहे.

यानंतर आता तुम्हाला तुमचा आवडता व्हिडिओ शोधायचा आहे. कारण आता प्रत्येक व्हिडिओवर डाउनलोडचा पर्याय उपलब्ध नसणार परंतु ज्या व्हिडिओंवर हा पर्याय असेल, तुम्हाला व्हिडिओच्या बाजूला असणाऱ्या मेनू बटणावर क्लिक करावे लागणार आहे.

मेनू बटण 3 बिंदूंसारखे दिसते. तुम्ही येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या रिझोल्यूशननुसार व्हिडिओ डाउनलोड करू शकता. परंतु, हे लक्षात घ्या की व्हिडिओ डाउनलोड करताना तुमच्याकडे चांगले इंटरनेट कनेक्शन असणे खुप गरजेचा आहे. एकदा व्हिडीओ डाऊनलोड झाला की तो पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा इंटरनेटची गरज भासणार नाही.

हा पर्याय आहे उत्तम

तुम्हाला जे व्हिडिओ सतत पहायला आवडतात त्यांच्यासाठी येथे दिलेली पद्धत वापरली जाऊ शकते. परंतु तुम्ही कोणताही माहितीपूर्ण व्हिडिओ डाउनलोड आणि सेव्ह करू शकता.