Gold Price Update : सोन्याने पुन्हा गाठला उच्चांक! 14 ते 24 कॅरेटची किंमत जाणून घ्या

Published on -

Gold Price Update : देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे अनेकजण मोठ्या प्रमाणावर सोने तसेच चांदीची खरेदी करत आहेत. अशातच जर तुम्हीही चांदी किंवा सोने खरेदी करणार असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

कारण पुन्हा एकदा सोन्याने उच्चांक गाठला आहे. तुम्हाला आता खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. जर तुम्ही सोने खरेदी करायला जाणार असाल तर त्या पूर्वी 14 ते 24 कॅरेटची किंमत जाणून घ्या. दरम्यान उद्यापासून नवीन व्यावसायिक सप्ताहाला सुरुवात होत आहे.

सध्या सोन्याची 59653 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 69756 रुपये प्रति किलो या सर्वोच्च पातळीवर विक्री केली जात आहे. गेल्या संपूर्ण व्यवहार सप्ताहात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. मागील आठवडाभरात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1433 रुपयांनी तर चांदीचा भाव 2983 रुपयांनी वाढला आहे.

जाहीर होत नाहीत शनिवार रविवारी दर

हे लक्षात घ्या की इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन हे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या वगळता शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. याचाच अर्थ असा की आता सोमवारी सोने आणि चांदीचे नवे दर जाहीर होणार आहेत.

शुक्रवारी हे होते दर

शुक्रवारी सोने प्रति 10 ग्रॅम 449 रुपयांनी महाग होऊन 59086 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 449 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने चढून 59086 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला होता.

इतकेच नाही तर शुक्रवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. शुक्रवारी चांदीचा भाव 621 रुपयांनी वाढून 69756 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे. तर गुरुवारी चांदीचा भाव 915 रुपयांच्या उसळीसह 69135 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.

जाणून घ्या नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर

या वाढीनंतर 24 कॅरेट सोने 567 रुपयांनी महाग होऊन 59653 रुपये, 23 कॅरेट सोने 565 रुपयांनी महाग होऊन 59414 रुपये, 22 कॅरेट सोने 519 रुपयांनी 54642 रुपये, 18 कॅरेट सोने 425 रुपयांनी महाग होऊन 44740 रुपये झाला आहे. तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 565 रुपयांनी महाग होऊन 34897 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार होत आहे.

सोने 200 रुपयांनी महाग तर चांदी झाली 10,200 रुपयांनी स्वस्त

यानंतर सोने आतापर्यंतच्या उच्चांकावरून 174 रुपये प्रति 10 ग्रॅमने महाग झाले आहे. या अगोदर सोन्याने 20 मार्च 2022 रोजी सर्वकालीन उच्चांक गाठला होता. तर त्या दिवशी सोन्याचा भाव 59479 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. तसेच चांदी त्याच्या उच्च पातळीपेक्षा 10224 रुपये प्रति किलो दराने स्वस्त झाली आहे. हे लक्षात घ्या की चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

हे आहे सर्वात शुद्ध सोने

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते, मात्र हे लाक्षात घ्या की या सोन्यापासून दागिने बनवता येत नाहीत कारण ते खूप मऊ असते. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी बहुतेक 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे.तर 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने बनवण्यात येतात, बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोन्याची विक्री करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe