Uddhav Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत! उद्धव ठाकरे यांचा राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा…

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा झाली. सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्र सरकारवर आपल्या भाषणामधून जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना देखील खडसावले आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण सावरकर यांचा अपमान सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केले ते येड्या गबाळ्याचे काम नाही. सावरकरांनी १४ वर्ष छळ सोसला. जसे आपले क्रांतीकारक बळी गेले. मरण यातना सावरकर १४ वर्ष सोसत आहे. आम्ही सावरकर भक्त आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपमध्येही काही सावरकरांचे भक्त आहेत तर काही अंध भक्त झालेत. या सभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. आता भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लागले आहे.

हिंमत असेल तर तातडीने निवडणुका घ्या, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागा. मी माझ्या वडिलांच्या नावाने मत मागतो. एकनाथ शिंदे गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा कर्तृत्व शुन्य आहे. कारण अजूनही माझ्या वडिलांचे नाव तुम्हाला वापरावे लागते हा तुमचा पराभव आहे, असेही ठाकरे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe