Pune-Mumbai Flight : देशाची आर्थिक आणि राज्याची राजधानी मुंबई तसेच राज्याचे सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर पुणे यादरम्यान कालपासून विमानसेवा सुरू झाली आहे. वास्तविक हे दोन्ही कॅपिटल शहर राज्याच्या दृष्टीनेच नाही तर देशाच्या दृष्टीने अति महत्त्वाची शहरे आहेत. या दोन्ही शहरांदरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र या दोन्ही शहरात दरम्यान प्रवास करण्यासाठी तब्बल पाच वर्षांपासून विमानसेवा नव्हती.
यामुळे पाच वर्षांपासून प्रवाशांच्या माध्यमातून या मार्गावर विमानसेवा बहाल करण्याची मागणी होत होती. दरम्यान आता टाटा समूहाच्या मालकी असलेल्या एअर इंडियाने 26 मार्च 2023 पासून या दोन्ही शहरांदरम्यान विमान सेवा बहाल करण्याचा निर्णय घेतला असून कालपासून ही सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण असून पहिल्याच दिवशी या विमान सेवेला प्रवाशांनी मोठी पसंती दर्शवली आहे.
हे पण वाचा :- शिंदे-फडणवीस सरकारचा एसटी तिकिटात 50% सवलतीचा निर्णय रद्द होणार? पहा काय आहे प्रकरण
हाती आलेल्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी पुणे मुंबई आणि मुंबई पुणे ही विमानसेवा हाऊसफुल राहिली आहे. संपूर्ण तिकिटांची बुकिंग झालेली होती. यामुळे निश्चितच या विमान सेवेचा प्रवाशांना फायदा होत असल्याचे चित्र आहे. वास्तविक पुणे आणि मुंबई या दोन शहरा दरम्यान रेल्वे मार्गाने प्रवास करण्यासाठी तीन तासांचा कालावधी खर्च करावा लागतो. मात्र आता विमानाने प्रवास केल्यास एका तासात पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुणे गाठता येणे शक्य होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पाच वर्षांपूर्वी पुणे ते मुंबई दरम्यान जेट एअरवेज ची विमान सेवा कार्यरत होती. मात्र ही विमान सेवा 2019 मध्ये बंद करण्यात आली. तेव्हापासून या मार्गावर कोणताच विमान उड्डाण घेत नव्हतं. दरम्यान आता 26 मार्च 2023 पासून एअर इंडियाने आपली विमानसेवा या मार्गावर बहाल केली आहे. यामुळे प्रवाशांकडून एअर इंडियाच्या या निर्णयाचे स्वागत होत असून पुणे ते मुंबई ही राज्यातील दोन महत्त्वाची शहरे यामुळे आणखी जवळ झाली आहेत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता लागू; GR जारी, पहा….
किती आहेत तिकीट दर?
एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते मुंबई या 124 किलोमीटरच्या हवाई मार्गावरील प्रवासासाठी पुणे ते मुंबई इकॉनॉमी क्लाससाठी २२३७ रुपये तर सुपर व्हॅल्यू इकॉनॉमी क्लाससाठी ३७३८ असा तिकीट दर आहे. फ्लेक्सी सेव्हर इकॉनॉमी ६५७३ अन् फेक्झिबल इकॉनॉमीसाठी ११ हजार ८२३ रुपये तिकीट दर आहेत.
मुंबई ते पुणे तिकीट दर किती?
मुंबई ते पुणे असा प्रवास करण्यासाठी इकॉनॉमी क्लाससाठी १९२२ रुपये तर सुपर व्हॅल्यू इकॉनॉमी क्लाससाठी ३४२३ असा तिकीट दर आहे. फ्लेक्सी सेव्हर इकॉनॉमी ६२५८ अन् फेक्झिबल इकॉनॉमीसाठी ११ हजार ५०८ रुपये तिकीट दर एअर इंडिया च्या माध्यमातून प्रवाशांकडून आकारते जाणार आहेत.
कसं आहे वेळापत्रक?
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की ही विमान सेवा शनिवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहे. मुंबईवरून सकाळी पावणेदहा वाजता पुण्याच्या दिशेने विमान उड्डाण करेल आणि ते पावणेअकरा वाजता हे विमान पुण्यात पोहोचेल.
तसेच पुण्यातून हे विमान सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी उड्डाण करेल आणि मुंबईत 12 वाजून 20 मिनिटांनी पोहचणार आहे.
एअर इंडिया लवकरच घेणार हा निर्णय
पुणे ते मुंबई दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या विमान सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे लवकरच एअर इंडिया कडून या मार्गावर आणखी फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी या रूटवर आणखी एक फेरी एअर इंडिया च्या माध्यमातून चालवली जाणार आहे. निश्चितच हा देखील निर्णय एअर इंडियाने घेतला तर या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास हा सोयीचा होईल आणि येथील हजारो प्रवाशांना याचा लाभ होईल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, उन्हाळी हंगामात ‘या’ भाजीपाला पिकांची शेती सुरू करा; चांगली कमाई होणार, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला