Affordable Sedan Car : Hyundai Verna खरेदी करताय तर जरा थांबा! ही स्वस्त सेडान कार देते 28km मायलेज, किंमत फक्त 6.30 लाख

Ahmednagarlive24 office
Published:

Affordable Sedan Car : भारतातील लोकप्रिय कार उत्पादक कंपनी Hyundai कडून नुकतीच नवीन Hyundai Verna 2023 ही कार नवीन रूपामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या कारमध्ये कंपनीकडून अनेक बदल करण्यात आले आहेत.

Hyundai Verna 2023 या सेडान कारची किंमत 10.90 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये कंपनीकडून 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. ही कार 20.60 kmpl पर्यंत मायलेज देते.

या कारच्या डिझाईनमध्येच नाही तर अनेक फीचर्समध्ये देखील बदल करण्यात आला आहे. या कारमध्ये नवीन ADAS स्तर 2 वैशिष्ट्य देखील देण्यात आले आहे. त्यामुळे आता अनेकजण ही नवीन Verna कार खरेदी करत आहेत.

पण बाजारात आणखी एक कार उपलब्ध आहे. जी Verna कारपेक्षा देखील जास्त मायलेज देते. तसेच तिची किंमत Verna कारच्या तुलनेत खूपच कमी आहे. Hyundai Aura ही सेडान कार तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

Hyundai Aura किंमत

Hyundai कंपनीकडून नुकतीच Aura ही कार देखील अपडेट करण्यात आली आहे. या कारमध्ये एकूण चार मॉडेल कंपनीकडून लॉन्च करण्यात आले आहेत. E, S, SX आणि SX(O) अशी Aura कारची मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत.

या कारच्या बेस मॉडेलची किंमत 6.30 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची किंमत 8.87 लाख रुपये एक्स-शोरूम, दिल्लीमधील आहे. ही कार ६ रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

इंजिन आणि मायलेज

या कारमध्ये कंपनीकडून 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारमध्ये CNG पॉवरट्रेन देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ही CNG मॉडेल 28kmpl मायलेज देते.

वैशिष्ट्ये

सेडान कारमध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, वायरलेस फोन चार्जर आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल यासारखी वैशिष्ट्ये आहेत.

सुरक्षिततेसाठी, यात बेसिक मॉडेलमध्ये 4 एअरबॅग्ज (टॉप व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज), इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) देण्यात आल्या आहेत. याशिवाय रिव्हर्स कॅमेरा, ISOFIX चाइल्ड-सीट अँकर आणि हिल-स्टार्ट असिस्ट देखील उपलब्ध आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe