Ahmednagar News | सुपा एमआयडीसीतील कंपनी कामगाराची आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Published:

पारनेर तालुक्‍यातील सुपा एमआयडीसीतील पीजी टेक्नो प्लास्ट कंपनीतील एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली. अमित राजेंद्रप्रसाद यादव (वय ३४), मूळ रा. उत्तर प्रदेश हल्ली, रा. पीजी टेक्नो प्लास्ट कंपनी कामगार वसाहत, सुपा एमआयडीसी, असे आत्महत्या केलेल्या कामगारचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे की,दि.२४ रोजी कंपनी वसाहतीमधील खोलीतील इतर कामगार जेबणासाठी निघाले, त्यावेळी अमित यादव फोनवर बोलत होता. त्याने इतरांना जेवायला जा, असे सांगून तो खोलीवरच थांबला.

सहकारी जेवण करून परत आल्यावर त्यांना खोलीचा दरवाजा बंद दिसला, त्यांनी आवाज देऊनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खोलीत डोकावले असता, अमित यादवने फाशी घेतल्याचे त्यांचे लक्षात आले, कामगारांनी तत्काळ पोलिसांना कळविले.

सुपा पोलिस व कामगारांनी त्यास दवाखान्यात नेले असता, न डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. यादव याने आत्महत्या का केली ? हे मात्र समजू शकते नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयताच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार खैरे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe