Ahmednagar News | चार गावठी कट्टे, आठ काडतुसांसह दोघे जेरबंद

Published on -

तालुक्‍यातील बेलापुर बुद्रूक येथील बाजारतळ येथे विक्री करण्याचे उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे अवैधरित्या बाळगणारे दोन आरोपीना नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १ लाख ४५ हजार ७०० रुपये किंमतीचे मुद्देमेलासह जेरबंद केले आहे.

जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, दत्तात्रय डहाळे (रा. शिर्डी) हा त्याचे साथीदारासह गावठी कट्टे ब जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी बाजारतळ, बेलापुर बुद्रुक (ता.श्रीरामपुर) येथे येणार आहेत.

आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हवालदार मनोहर सिताराम गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, संदिप घोडके, विशाल दळवी, शंकर चौधरी, दिलीप शिंदे, संदिप चव्हाण, सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित जाधव व उमांकात गावडे, अर्जुन बडे यांनी मिळून वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने बेलापुर बुद्रुक येथील बाजारतळ येथे जावुन सापळा लावुन थांबले.

दत्तात्रय डहाळे व त्याचे सोबत एक इसम बेलापुर बु बाजार वेशीतून बाजारतळाकडे पायी येतांना दिसल्याने पथकाची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे दत्तात्रय सुरेश डहाळे (वय ३४, रा. श्रीराम नगर, शिर्डी), सुलतान फत्तेमोहमद शेख (वय २९, रा. महलगल्ली, बेलापुर बु. ता. श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले.

त्यांचे अंगझडतीत एकुण १,४५,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतूसे असा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार मनोहर सिताराम गोसावी यांच्या फिर्यादीवरुन येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस पथक करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News