Top-5 Safest SUV : या आहेत देशातील 5 सर्वात सुरक्षित कार, कार खरेदी करण्यापूर्वी पहा यादी

Ahmednagarlive24 office
Published:

Top-5 Safest SUV : आजकाल देशामध्ये अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नवीन कार खरेदी करत असताना ग्राहक कारची सुरक्षितता पाहून कार निवडत असतात. तसेच आता अनेक कार कंपन्या देखील कार उत्पादन करताना सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून बनवत आहेत.

नवीन कार खरेदी करत असताना फीचर्स, किंमत आणि त्यासोबतच कारमध्ये किती सुरक्षितता पुरवली गेली आहे हे देखील पाहणे गरजेचे आहे. आज तुम्हाला देशातील ५ सुरक्षित कारबद्दल सांगणार आहोत.

1. VW TAIGUN & SKODA KUSHAQ

भारतामध्ये बनवल्या जाणाऱ्या अनेक कार कंपन्या कार बनवताना कारच्या सुरक्षितेला अधिक महत्व देतात. VW Taigun आणि Skoda Kushaq या दोन्ही कार भारतामध्ये बनवल्या गेलेल्या सर्वात सुरक्षित मेड-इन-इंडिया SUV कार आहेत. दोन्ही GNCAP ने अपघातात 5 स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे.

2. टाटा पंच

टाटा मोटर्सच्या अनेक कार सध्या लोकप्रिय आहेत. तसेच टाटा मोटर्सकडून सर्वच कारमध्ये अधिक सुरक्षा दिली जाते. पण टाटा मोटर्सकडून पंच या SUV कारला सर्वाधिक सुरक्षा पुरवण्यात आली आहे. ग्लोबल NCAP कडून टाटा पंचला 5 स्टार सुरक्षा रेटिंग प्रौढांसाठी आणि लहान मुलांसाठी 4 स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहे.

3. महिंद्रा XUV300

महिंद्रा कंपनीच्या कार अधिक मजबूत मानल्या जातात. तसेच पूर्वीपासूनच या कंपनीच्या गाड्यांना भरपूर प्रतिसाद मिळत आहे. महिंद्रा XUV300 या कारला NCAP ने अपघात चाचणीमध्ये प्रौढांसाठी 5 स्टार सुरक्षा रेटिंग आणि लहान मुलांसाठी 4 स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात आले आहेत.

4. महिंद्रा XUV700

महिंद्राची XUV700 देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक सुरक्षित मानली जाते. महिंद्राची XUV700 या SUV कारला ग्लोबल NCAP कडून प्रौढांसाठी 5 स्टार रेटिंग आणि लहान मुलांसाठी 4 स्टार रेटिंग देण्यात आले आहे.

5. टाटा नेक्सॉन

टाटा मोटर्सच्या टाटा नेक्सॉन SUV कारला ग्लोबल NCAP ने अपघात चाचणीमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आले आहे. भारतातील ही पहिली 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली मेड-इन-इंडिया SUV कार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe