IMD Alert : हवामानाचा मूड पुन्हा बदलणार! २९ मार्चपासून 11 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा, अलर्ट जारी

Ahmednagarlive24 office
Published:

IMD Alert : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे उष्णतेत वाढ होऊ लागली आहे. तर आता पुन्हा एकदा हवामानाचा मूड बदलणार असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत असल्याने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

३० मार्चपासून सक्रिय होणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव देशातील ११ राज्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा ते पश्चिम बंगाल आणि देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याचा अंदाज काय म्हणतो?

२९ मार्चपर्यंत देशभरातील वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवान्ह्यात आला आहे. तसेच त्यानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. अनेक राज्यांमध्ये पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज खाजगी हवामान संस्था स्कायमेटकडून देखील वर्तवण्यात आली आहे.

तुमच्या राज्यांची स्थिती जाणून घ्या

उत्तर प्रदेशमध्ये २९ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमध्ये तापमानात ३ अंशांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच ३० मार्च नंतर वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत असल्याने 31 मार्च रोजी लखनऊ आणि आसपासच्या भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मध्य प्रदेशमधील वातावरण देखील २९ मार्च नंतर बदलेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. ग्वाल्हेर-चंबळसह रीवा, जबलपूर, उज्जैन विभागातील काही शहरांमध्ये हलक्या रिमझिम पावसाची शक्यता आहे.

30 मार्चला श्योपूरकलन सिंगरौली, सिधी, रीवा, सतना, अनुपपूर, शहडोल, उमरिया, दिंडोरी, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, छिंदवाडा, सिवनी, मंडला, बालाघाट आणि राजगड येथे हलका पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाच्या माहितीनुसार 29-30 मार्च नंतर वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे जोधपूर आणि बिकानेरच्या भागात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राजस्थानमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

29 मार्च रोजी बिकानेर, चुरू, हनुमानगढ, जैसलमेर, नागौर आणि श्रीगंगानगरमध्ये गडगडाट, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच 30-40 किमी प्रतितास वारे वाहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज ओडिशा आणि गंगेच्या पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe