Optical Illusion : सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन चित्रे व्हायरल होत आहेत. अशी ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवण्यात लोकांनाही आनंदात होत आहे. ऑप्टिकल इल्युजन चित्रे डोळ्यांना दिसतात इतकी सोपी नसतात. कारण यामध्ये शोधण्यास सांगितलेली गोष्ट सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही.
ऑप्टिकल इल्युजन चित्रात लपलेले कोडे शोधण्यास सांगतले जाते. यासाठी काही सेकंदाचा कालावधी दिला जातो. त्या कालावधीमध्येच ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवावे लागते. अन्यथा तुम्ही हे चित्र सोडवण्यात अपयशी व्हाल.
आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये ५ फरक शोधण्यास सांगितले आहेत. चित्रामध्ये कोल्हा आणि त्याच्या पाठीमागे झाड दिसत आहे. यामध्ये पाच फरक लपलेले आहेत ते शोधायचे आहेत.
चित्रात काय आहे
आजची जी चित्रे तुमच्या समोर दिसत आहेत ती अगदी सारखीच आहेत. मात्र, हा फोटो जरा नीट पाहिल्यास लक्षात येईल की, या दिलेल्या चित्रात पाच चुका आहेत, ज्या तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला लगेच लक्षात येईल.
ऑप्टिकल इल्युजनच्या या दोन्ही चित्रांमध्ये तुम्हाला कोल्हा दिसत असेल. कोल्हा जंगलासारख्या ठिकाणी उभा आहे. या दोन्ही चित्रांमध्ये ५ फरक आहेत. ते पाच फरक तुम्हाला 10 सेकंदात शोधायचे आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणारी ऑप्टिकल इल्युजन चित्रे सोडवण्याचा प्रयत्न केला तर मेंदूचा व्यायाम आणि निरीक्षण कौशल्यात वाढ होते असे तज्ञांकडून सांगितले जाते. त्यामुळे अशी चित्रे सोडवणे एक फायद्याचीच गोष्ट आहे.
पहा उत्तर
आजच्या कोल्ह्याच्या चित्रामध्ये तुम्हाला पाच फार सापडले नाहीत तर काळजी करू नका. कोल्ह्याचा चेहरा पाहताच तुम्हाला पहिला फरक समजेल. पहिल्या चित्रात कोल्ह्याचा दात दिसतो, तर दुसऱ्या फोटोत असे काहीही दिसत नाही. दुसरा फरक कोल्ह्याच्या मागील पायांमध्ये आहे. पहिल्या चित्रात कोल्ह्याच्या मागच्या पायाच्या केसांमध्ये थोडी लाट आहे.
तर दुसऱ्या फोटोत केस सपाट आहे. तिसरा फरक म्हणजे कोल्ह्याच्या कानाला स्पर्श करताना दिसणारे झाड. त्यात आहेत. पहिल्या चित्रात झाडाची एक शाखा कमी आहे. कोल्ह्याच्या मागच्या पायांच्या दिशेने पडलेल्या दगडाजवळ तुम्हाला चौथा फरक दिसेल.
पहिल्या चित्रात दगडाजवळ गवत नाही. तर दुसऱ्या फोटोत तुम्हाला दगडाजवळ गवत दिसेल. पाचवा फरक कोल्ह्याच्या पुढच्या पायांच्या जवळ असलेल्या गवतामध्ये आहे. खालील चित्रात तुम्ही स्पष्ट पाहू शकता.