Best Destination : फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर महाराष्ट्रातील या 5 ठिकाणांना द्या भेट, अविस्मरणीय होईल तुमची ट्रिप

Ahmednagarlive24 office
Published:

Best Destination : भारतामध्ये पर्यटकांना खुणावणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी विदेशातून लाखो पर्यटक भारतातील सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी येत असतात. तसेच भारतातीलही अनेक लोक सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणायचा प्लॅन करत असतात.

आता लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. त्यामुळे अनेकांना या दिवसांमध्ये सुट्ट्या असतात. त्यामुळे लाखो लोक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी घराबाहेर पडत असतात. तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर बाहेर जाणायची गरज नाही.

कारण महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहून तुमच्या डोळ्यांना मनमोहक वाटेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेईचा असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील ५ ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत.

ही सर्वोत्तम ठिकाणे आहेत

सूर्यमाळ

नाशिक पासून सूर्यमाळ हे हिल स्टेशन फक्त ६ किमी अंतरावर आहे. हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेले ठिकाण आहे. या ठिकाणची मनमोहक दृश्य पाहण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात. हे हिल स्टेशन समुद्रसपाटीपासून १८०० फूट उंचीवर आहे.

कोरोली हिल स्टेशन

नाशिकपासून १५० किमी अंतरावर कोरोली हिल स्टेशन आहे. या ठिकाणी देखील दरवषी लाखो पर्यटक येत असतात. येथील नैसर्गिक वातावरण आणि प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करत असतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद तुम्ही या ठिकाणी भेट देऊन घेऊ शकता.

लोणावळा-खंडाळा

महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी लोणावळा-खंडाळा हे एक आहे. या ठिकाणी देखील लाखो पर्यटक भेट देत असतात. येथील नैसर्गिक वातावरण आणि येथील धबधबे खूप प्रसिद्ध आहेत. तसेच या ठिकाणी तलाव, कार्ला इंडियाज ड्यूक नोज, लोहगड किल्ला पाहण्यासाठी लाखो लोक येत असतात.

भंडारदरा

नाशिकपासून ७२ किमी अंतरावर असलेला भंडारदरा घाट सर्वात प्रसिद्ध आहे. कळसूबाई पर्वताचे सर्वोच्च शिखर म्हणून ते प्रसिद्ध आहे. छत्री धबधबा, रंधा धबधबा, रतनवाडी गाव यासारखी ठिकाणे पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. तुम्हीही या ठिकाणी भेट देऊ शकता. हे सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील महाबळेश्वर सर्वाधिक प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. हे एक अतिशय सुंदर नैसर्गिक सौंदर्याने भरलेले ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही जम्मू-काश्मीरमधील थंड हवेसारखा आनंद घेऊ शकता.

येथे तुम्ही हेड पॉइंट, चायनामन फॉल्स, महाबळेश्वर मंदिर, धोबी फॉल्स, वेण्णा लेक, प्रतापगड किल्ला आणि टायगर स्प्रिंग्स यांसारख्या ठिकाणांना भेट देऊन प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe